शिकागोमध्ये होणाऱ्या विश्व हिंदू काँग्रेसच्या संमेलनात रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये विश्व धर्म सभेत दिलेल्या भाषणाच्या १२५व्या वर्षपूर्तीनिमित्त या संमंलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान हे संमेलन होणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू समारोपाचे भाषण करणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथून दहा पेक्षा अधिक लोक सहभाग घेणार आहेत. तसेच जगभरातील ८० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्व हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे संयोजक अजय गुप्ता यांनी बुधवारी लखनऊमध्ये ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शिकागोत होणाऱ्या विश्व हिंदू काँग्रेसमध्ये जगभरातील ८० देशांचे २५०० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभाग घेतील अशी आशा आहे. विश्व हिंदू काँग्रेसचा हेतू हिंदू समाजाला एकजूट करणे त्याचबरोबर समाजाच्या हिताची काळजी घेणे आणि देशभरातील वंचित समुदायांची मदत करणे हा आहे. हे केवळ धार्मिक संमेलन नाही. या संमेलनात समाजाशी जोडलेल्या विविध अशा मुद्द्यांवर जोर दिला जाणार आहे. जे आधुनिक काळात कोणत्याही समाजासाठी प्रगतीशील असतील, असेही गुप्ता यांनी सांगितले आहे.

गुप्ता यांच्यामाहिती नुसार, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते गुरुवारी शिकागोकडे रवाना होणार आहेत. या संमेलनात आर्थिक, शैक्षणिक, माध्यमं, संघटन, राजकीय, महिला तसेच तरुणांशी निगडीत मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यामध्ये जागतिक हिंदू समाजाची मुल्ये मांडली जाणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat will be keynote speaker in chicagos world hindu congress program
Show comments