नरेंद्र मोदी ही देशाला मिळालेली दैवी देणगी आहे, या केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंच्या विधानाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. राजस्थानामध्ये झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेनंतर मंगळवारी दिल्ली येथे संघ आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी संघाकडून नरेंद्र मोदींच्या दैवीकरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्षात व्यक्तीपूजेला थारा देऊ नका, कारण संघटना हीच सर्वोच्च असते, असा सल्लाही संघाकडून भाजप नेत्यांना देण्यात आला. या बैठकीला संघाचे सुरेश भैयाजी जोशी, कृष्ण गोपाळ, दत्तात्रय होसबाळे हे नेते उपस्थित होते. तर भाजपकडून पक्षाध्यक्ष अमित शहा, सरचिटणीस रामलाल आणि उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.
मोदी म्हणजे भारताला मिळालेली दैवी देणगी- व्यंकय्या नायडू
यावेळी संघनेत्यांनी अमित शहा यांना भाजपच्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरील वाटचालीस हिरवा कंदील दाखवला. मात्र, त्याला विकासाची जोड देण्यात यावी, असा सल्ला संघाकडून शहांना देण्यात आला. काही दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पार पडली होती. ही बैठक म्हणजे मोदींचा कौतुकसोहळा ठरला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा