संघाची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भरवण्यात आलेला खटला 16 मार्च 2019 पर्यंत तहकूब करण्यात आल्याचे भिवंडी कोर्टाने म्हटले आहे. 7 जुलै 2014 रोजी भिवंडीत झालेल्या एका रॅलीमध्ये राहुल गांधींची हजेरी होती. त्यावेळी संघाच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली असा आरोप केला होता. याचप्रकरणी संघाने राहुल गांधींविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर आरएसएसच्या भिवंडी शाखेचे सचिव राजेश कुंटे यांनी बदनामीचा खटला दाखल केला. दरम्यान माझ्याविरोधात लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत असे राहुल गांधींनी याआधीच म्हटले आहे. आता हा खटला 16 मार्च 2019 पर्यंत तहकूब करण्यात आला आहे.

Story img Loader