मध्य प्रदेशाच्या पशुसंवर्धनमंत्री कुसुम मेहदेले यांनी एका मुलाला लाथ मारल्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यामुळे निर्माण झालेल्या वादात आता संघ परिवारानेही उडी घेतली आहे. सार्वजनिक क्षेत्रात वावरताना मंत्र्यांनी अतिसंवेदनक्षम राहिले पाहिजे, असे संघ परिवाराने म्हटले आहे. जनतेप्रती उर्मट वर्तन करणाऱ्या मंत्र्यांविरोधात मध्य प्रदेश सरकारने याबाबत कारवाई करावी, असे खासदार अशोक सोहानी यांनी म्हटले आहे. मेहदेले यांनी एका मुलाला लाथ मारल्याची व्हिडीओ फीत १ नोव्हेंबर रोजी प्रसारित झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
पन्ना जिल्ह्य़ातील बस स्थानकावर राज्य स्थापनादिनाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला होता. मेहदेले यांची हकालपट्टी करण्याची मागणी मनीष तिवारी यांनी केली आहे.

Story img Loader