भाजपविरोधात बोलणं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे गोवा प्रमूख सुभाष वेलिंगकर यांना महागात पडले आहे. त्यांच्याकडून गोवा राज्याचे प्रमुखपद काढून घेण्यात आल्याचे संघाचे ज्येष्ठ सदस्य मोहन वैद्य यांनी आयएनएसशी बोलताना सांगितले. नुकताच वेलिंगकर यांनी पुढील वर्षी गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळणार नसल्याचे म्हटले होते. त्यांचे हेच वक्तव्य त्यांना पदावरून हटवण्यास कारणीभूत ठरले. यापूर्वीही वेलिंगकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना काळे झेंडे दाखवले होते.
गोव्यातील भाजप सरकारने मागील निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. याचा परिणाम पुढील निवडणुकीत होणार असून ते येथे निवडणूक जिंकू शकणार नाहीत. त्यांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप वेलिंगकर यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल संघाच्या ज्येष्ठांनी घेतली. यापूर्वी वेलिंगकर यांनी अमित शहा यांना काळे झेंडे दाखवले होते. भोपाळ येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत शहा यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
गोव्यामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यानंतर लक्ष्मण पार्सेकर यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा आली आहे. यंदा आम आदमी पक्षानेही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा