RSS New Headquarter : देशाच्या राजधानीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नवं मुख्यालय उभं राहतं आहे. या मुख्यालयाचं काम जवळपास संपत आलं आहे. १२ मजली इमारतीत संघाचं मुख्यालय विस्तारलं आहे. दिल्लीतल्या या मुख्यालयाची (RSS New Headquarter ) खासियत काय आहे आपण जाणून घेऊ.

काय आहे संघाच्या नव्या मुख्यालयाची खासियत?

संघाचं नवं मुख्यालय (RSS New Headquarter ) दिल्लीत उभं राहतं आहे. ही इमारत बारा मजल्यांची आहे. या इमारतीबाबत हरकत प्रमाणपत्र मिळावं म्हणून ऑगस्टमध्येच अर्ज करण्यात आला होता. दिल्लीच्या अर्बन आर्ट्स कमिशनने याला मान्यता दिली आहे. हे मुख्यालय जवळपास बांधून तयार आहे. ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी जो ऑनलाईन अर्ज करण्यात आला होता त्यात बांधकामाचा तेव्हापर्यंतचा तपशी, इमारतीचं स्केच, फोटो, सद्यस्थितीतले फोटो हे सगळंही पाठवण्यात आलं होतं. या प्रकल्पाला सीसी म्हणजेच कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळण्याआधी एनओसीची गरज असते. ते देण्यात आलं आहे. दिल्लीतल्या केशवकुंज या ठिकाणी ही इमारत उभारण्यात आली आहे.

केशवकुंजचं वैशिष्ट्य काय?

नोव्हेंबर २०१६ मध्ये या इमारतीचं (RSS New Headquarter ) भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर या ठिकाणी मोठी इमारत (RSS New Headquarter ) बांधण्यात आली. संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी एकूण तीन टॉवर उभारण्यात आले आहेत जे १२ मजली आहेत. ग्राऊंड प्लस बारा मजले प्रत्येक टॉवरमध्ये आहेत. केशवकुंज असं या इमारत संकुलाचं नाव आहे. यामध्ये एकूण १३ लिफ्ट आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टॉवरमध्ये प्रत्येकी पाच लिफ्ट आहेत तर तिसऱ्या टॉवरमध्ये तीन लिफ्ट आहेत. प्रत्येक टॉवरमध्ये एक सर्व्हिस लिफ्टही आहे. केशवकुंजचं आधीचं प्रवेशद्वार जिथे होतं तिथेच नवं प्रवेशद्वारही तयार करण्यात आलं आहे.

प्रवेशद्वार पूर्वीच्याच जागी

प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर एक भव्य स्वागत कक्ष आहे. या मोठ्या कक्षाच्या शेजारी हनुमान मंदिर आहे. केशवकुंजचे (RSS New Headquarter ) दोन मजले हे दिल्ली प्रांताला दिले जातील. तर प्रत्येक मजल्यावर विश्व विभाग असेल. या इमारतीत २० खाटांचं एक हॉस्पिटलही तयार करण्यात आलं आहे. या रुग्णालयात पॅथॉलॉजी लॅबसह इतर महत्त्वाच्या चाचण्यांची उपकरणंही असणार आहेत. तसंच व्यायामाची आधुनिक उपकरणंही एका भागात असणार आहेत.

२०० गाड्यांसाठी खास पार्किंग

केशवकुंजमद्ये एक ग्राहक वस्तू विक्री केंद्रही असणार आहे. ज्यामध्ये संघाचे गणवेश मिळू शकतील. तसंच इतर वस्तूही मिळतील. दुसर्या एका भागात संघाचं प्रकाशित साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात येईल. संघाची मुखपत्रं पांचजन्य आणि ऑर्गनायझर यांचे अंकही विक्रीसाठी ठेवण्यात येतील. या मुख्यालयात २०० हून अधिका गाड्या पार्क करता येतील एवढं पार्किंगही बांधण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.