RSS Workers : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केरळच्या थलासरी न्यायालयाने हा निर्णय मंगळवारी दिला. २००५ मध्ये सीपीआय (M) चा कार्यकर्ता रिजिथ शंकरन याची हत्या करण्यात आली होती. ३ ऑक्टोबर २००५ या दिवशी ही घटना घडली होती. या प्रकरणात न्यायालयाने नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे हे प्रकरण?

रिजिथ शंकरन याची हत्या २००५ मध्ये करण्यात आली होती. रिजिथ हा डाव्या विचारांचा कार्यकर्ता होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) यांच्यात वादावादी सुरु होती. ३ ऑक्टोबर २००५ या दिवशी रिजिथ हा त्याच्या घरी चालत चालला होता. त्याच्याबरोबर त्याचे मित्रही होते. त्यावेळी संघ स्वयंसेवकांचा एक जमाव त्या ठिकाणी आला. त्यांच्याकडे शस्त्रं होती. त्यांनी रिजिथ आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. रिजिथला या मारहाणीत गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर जखमाही झाल्या. तर त्याचे इतर मित्र जखमी झाले. या प्रकरणात आता थलासरी न्यायालयाने नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुधाकरन (वय-५७), जयेश (वय-४१), रणजीत (वय-४४), अजींदरन (वय-५१), अनिलकुमार (वय-५२), राजेश (वय ४६), श्रीजीत (वय ४३) आणि भास्करन (वय-६७) या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Spanish Tourist girl gored to death While bathing elephant
Elephant Attack : २२ वर्षीय तरुणीच्या थायलंड ट्रीपचा करुण अंत… आंघोळ घालताना हत्ती बिथरला अन्…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
six brothers marrying sisters in Pakistan
पाकिस्तानमध्ये सहा भावांचे सहा बहिणींशी लग्न, लहान भावाचे वय १८ वर्ष होण्यासाठी वर्षभर थांबले; या लग्नाची चर्चा का होतेय?
Loksatta editorial US National Security Advisor Jake Sullivan Nuclear deal Narendra Modi
अग्रलेख: अणू हवा,‘अरेवा’ नको!
Image of a person holding a kite string or a bike with a caution sign
Chinese Manjha : चिनी मांजाने घेतला निष्पाप तरुणाचा जीव, कामावरून परतत असताना झाला घात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Atul Subhash suicide case child custody
Atul Subhash Case: ‘आजी त्याच्यासाठी अनोळखी’, अतुल सुभाष यांच्या आईला नातवाचा ताबा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पोलिसांनी त्यावेळी हत्यारं आणि रक्ताने माखलेले कपडे केले होते जप्त

संघाच्या या स्वयंसेवकांकडे दोन तलवारी, एक मोठा खंजीर आणि एक स्टिलचा रॉड होता. पोलिसांनी ही हत्यारं जप्त केली. तसंच पोलिसांना आरोपींचे रक्ताने माखलेले कपडेही मिळाले. या प्रकरणात १४ मार्च २००६ ला आरोपपत्र दाखल झालं होतं. आत्तापर्यंत २८ साक्षीदारांच्या साक्षी या प्रकरणात नोंदवण्यात आल्या. तसंच ५९ पुरावे आणि दस्तावेज यांची ओळख पटवण्यात आली.

कुठल्या कलमांच्या अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला?

आयपीसीच्या कलम ३०३, कलम ३०७, कलम १४३ या अंतर्गत या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच कलम ३४१ आणि कलम ३२४ या कलमांच्या अंतर्गतही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या सगळ्यांना ४ जानेवारी या दिवशी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानेही दोषी ठरवलं होतं. एकूण १० स्वयंसेवक या गुन्ह्यात सहभागी होते. मात्र यातल्या एकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या नऊ जणांना हत्या केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader