मागील काही दिवसांपासून दिल्ली महापालिकेत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांमध्ये अनेकदा राडा झाला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आहे. भाजपा-आप नगरसेवकांमधील हा वाद थांबायचं नाव घेत नाहीये. दिल्ली महापालिकेत पुन्हा एकदा राडा झाला आहे.
सभागृहात नगरसेवकांनी एकमेकांना केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये काही नगरसेवक एका नगरसेवकाला खाली पाडून चक्क लाथा घालत आहेत. संबंधित नगरसेवक जमावापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. पण काही नगरसेवकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना धक्काबुक्की केली, त्यानंतर खाली पाडून लाथा घातल्या आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. नेटकऱ्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत.
महानगरपालिकेत वाद झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या नेत्या अतिशी यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी संवाद साधला आहे. भाजपाच्या काही पुरुष नगरसेवकांनी दिल्लीच्या नवनिर्वाचित महापौर शेली ओबेरॉय यांना धक्काबुक्की केली आहे. भारतीय जनता पार्टीने आपली हार मान्य करावी. त्यांनी महापालिकेच्या सभागृहातील गुंडागिरी थांबवावी, अशी टीका अतिशी यांनी केली.
दिल्ली महापालिकेत स्थायी समितीच्या निवडीसाठी आज मतदान पार पडलं. मतमोजणी सुरू असताना भाजपाला आपला पराभव होत आहे, असं दिसलं, त्यामुळे भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. भाजपाने फेरमतमोजणीची मागणी केली. तसेच त्यांनी महापौर शेली ओबेरॉय यांना धक्काबुक्की केली, असा आरोप अतिशी यांनी केला. हा वाद वाढत गेल्यानंतर भाजपा आणि ‘आप’च्या नगरसेवकांनी एकमेकांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.