महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यापाठोपाठ मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हेदेखील भाजपामध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या दोन दिवसांत पाहायला मिळाली. कमलनाथ पक्षनेतृत्वावर नारज असून त्यातूनच त्यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचंही चर्चेत आलं. यानंतर काँग्रेसकडून यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यात आली असून कमलनाथ भाजपामध्ये जात नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

नेमकी काय आहे चर्चा?

कमलनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर दिलेलं उत्तर याअनुषंगाने चर्चेचा विषय ठरलं होतं. “तसं काही असेल तर मी तुम्हाला सांगेनच”, अशा आशयाचं विधान कमलनाथ यांनी केल्यावर या चर्चांना उधाण आलं. त्यापाठोपाठ कमलनाथ यांच्या भाजपाप्रवेशाची तयारी पूर्ण झाल्याचेही दावे करण्यात आले. मात्र, मध्य प्रदेश काँग्रेसकडून मात्र हे दावे फेटाळण्यात आले असून कमलनाथ काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

Anup Soni Congress Advertisement
Anup Soni : क्राईम पेट्रोल फेम अभिनेता काँग्रेसच्या जाहिरातीत? व्हिडिओ शेअर करत म्हणाले…
Mukesh Ambani
Mukesh Ambani On AI : ChatGPT च्या वापराबाबत…
Mohandas Pai
“सीईओंना ५० कोटी रुपये पगार देता पण…”, इन्फोसिसचे माजी अधिकारी म्हणाले, “आयटी इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर्सचे शोषण”
Modi touches Patparganj candidate feet
Video: पंतप्रधान मोदींनी तरुण उमेदवाराला तीन वेळा केला वाकून नमस्कार; कारण काय?
Lady professor marries student west bengal
Video: महिला प्राध्यापिकेचं वर्गातच विद्यार्थ्याशी झालं लग्न; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या, “हा तर…”
Washington DC Plane Crash USA
US Plane Crash : अमेरिकेत ६४ प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाची लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडक, १८ मृतदेह ताब्यात
mahakumbh 2025 Guidlines
Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ परिसरात वाहनांवर बंदी, व्हीव्हीआयपी पास रद्द; चेंगराचेंगरीनंतर सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे!
Nijjar killing
“खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग नाही”, कॅनडाच्या अहवालातील निष्कर्ष!
Rajnath singh and pannun
Pannun Threat Rajnath Singh : खलिस्तान समर्थक पन्नूकडून थेट भारताच्या संरक्षण मंत्र्यांना धमकी, थेट शासकीय निवासस्थानी केला फोन!

“कमलनाथ यांच्याविरोधातला हा कट आहे. मी त्यांच्याशी स्वत: बोललो असून त्यांनी सांगितलंय की ते काँग्रेसच्या विचारसरणीशी बांधील आहेत. ते काँग्रेसमध्येच राहतील. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा कमलनाथ स्वत: यासंदर्भात स्पष्टीकरण देतील”, असा खुलासा मध्य प्रदश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी केला आहे. “भाजपा एखाद्याच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी कशाप्रकारे माध्यमांचा वापर करते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कमलनाथ यांनी मला सांगितलंय की या सगळ्या चर्चा म्हणजे त्यांच्याविरोधातील कारस्थानं आहेत”, असंही जितू पटवारी यांनी नमूद केलं.

आता कमलनाथ यांच्या मुलाची चर्चा?

दरम्यान, कमलनाथ हे काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं मध्य प्रदेश काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आता कमलनाथ यांचे पुत्र नकुल कमल नाथ हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. नकुल कमल नाथ यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) खात्यावरील बायोमध्ये बदल केला असून त्यातून ‘काँग्रेस’ हा शब्द काढल्याचा दावा मिंटनं दिलेल्या वृ्त्तात करण्यात आला आहे. आता नकुल कमल नाथ यांच्या बायोमध्ये ‘खासदार, छिंदवाडा (म.प्र.)’ एवढाच उल्लेख आहे.

दरम्यान, कमलनाथ यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा काँग्रेसकडून फेटाळण्यात आल्यानंतर त्यांच्या मुलाच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द कमलनाथ यांनीच समोर येऊन यासंदर्भात नेमकं स्पष्टीकरण द्याव, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त होऊ लागली आहे.

Story img Loader