गेल्या काही दिवसांपासून रुपयाचा उलट्या दिशेने सुरू असलेला प्रवास अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी रुपयानं नवा नीचांक गाठला आणि बाजारपेठेत चिंतेचं वातावरण पसरलं. शुक्रवारी रुपयानं १६ पैशांची मोठी घट नोंदवली. त्यामुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर थेट ८२.३३ पर्यंत जाऊन पोहोचला आहे. रुपयाच्या अवमूल्यनाची अनेक कारणं समोर येत असली, तरी त्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींचं प्रमुख कारण दिलं जात आहे. याशिवाय, अमेरिकी बॉण्डचे दर, गुंतवणूकदारांमधला निरुत्साह हे घटकदेखील यासाठी कारणीभूत ठरल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज सकाळी साडेनऊच्या सुमारास रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत ८२.३० इतका होता. याआधीच्या ८१.८९ दरावरून रुपया बाजार उघडताच ८२.१९ वर गेला आणि अजून खाली उतरत ८२.३३पर्यंत घटला. गुरुवारी तर ५५ पैशांनी रुपया उतरला होता. त्यामुळे दिवसेंदिवस रुपयाच्या होणाऱ्या अवमूल्यनामुळे बाजारपेठेत आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

वर्षभरात १० टक्क्यांनी घटला रुपया!

दरम्यान, गेल्या वर्षभरात रुपयानं तब्बल १० टक्क्यांची घट नोंदवल्याचं समोर आलं आहे. पीटीआयच्या हवाल्याने एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, आरबीआयनं सातत्याने परकीय गंगाजळीच्या विक्रीतून रुपयाचं अवमूल्यन रोखण्यासाठी प्रयत्न करूनही रुपयाचा उलटा प्रवास थांबवण्यात अपयश येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupee fallen all time low above 82 against american dollar indian market share pmw