भारताने काळय़ा पैशाच्या विरोधात सुरू केलेल्या मोहिमेत स्वित्र्झलड केंद्रस्थानी असला तरी कालांतराने तेथील गुंतवणुकीची माहिती सरकारला आपोआप मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे, परंतु गमतीची बाब अशी, की रुपयाचे चलनमूल्य कमी असूनही स्वीस पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेल्या चलनात रुपयाचा क्रमांक तिसरा लागला आहे. गेल्या वर्षी रुपयाची बरीच पडझड होऊनही रुपयाचे बनावट चलन जास्त प्रमाणात स्वित्र्झलड पोलिसांनी जप्त केले आहे.
बनावट चलनाच्या सांख्यिकीचे आकडे फेडरल ऑफिस ऑफ पोलिस (फेडपोल) यांनी जाहीर केले असून, त्यात २०१४ मध्ये रुपयाच्या चलनातील १८१ नोटा जप्त करण्यात आल्या. २०१३ मध्ये ४०३ नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. युरोच्या २८६० व अमेरिकी डॉलरची ११०१ चलने जप्त केली होती. २०१४ मध्ये १६०५४ फ्रँक जप्त करण्यात आले होते, पण २०१३च्या तुलनेत हे बनावट चलनाचे प्रमाण निम्म्याने कमी झाले आहे. युरो व डॉलरची बनावट चलने मात्र २०१४ मध्ये वाढली.
स्वीस पोलिसांनी जप्त केलेल्यात चीनमधील युआन चलनाच्या ७१ नोटा व ब्रिटनच्या पाऊंड चलनाच्या २०१४ नोटांचा समावेश होता. फेडपोलच्या माहितीनुसार २०१३ मध्ये २३९४ युरो नोटा व ११०१ अमेरिकी डॉलरच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.
भारतीय चलनातील पाचशेच्या १४५ नोटा व हजार रुपयांच्या ३५ नोटा व शंभराची एक बनावट नोट जप्त करण्यात आली होती. २०१३ मध्ये स्वित्र्झलडमध्ये ५००च्या ३८० तर १००० रुपयांच्या २३ नकली नोटा जप्त केल्या होत्या. २०१२ पासून भारताच्या नकली चलनाचे प्रमाण कमी होत असून, २०१२ मध्ये २६२४ बनावट रुपयाच्या नोटा सापडल्या होत्या त्या वेळी डॉलरच्या ५२८४ बनावट नोटा सापडल्या होत्या, तर युरोच्या २०८४ बनावट नोटा सापडल्या होत्या. २०१२ मध्ये स्वीस फ्रँकच्या ४३०९ बनावट नोटा सापडल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा