ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्यामुळे भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक ब्रिटन पंतप्रधानपदाच्या आणखी एक पाऊल जवळ गेले आहेत. या शर्यतीत त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. सुनक यांच्या प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डन्ट यांना सध्या २९ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. त्या आपल्या समर्थकांचा आकडा १०० पर्यंत नेऊ न शकल्यास ऋषी सुनक आपोआपच पंतप्रधान होतील. विशेष म्हणजे यावर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सुनक यांना सध्या १४२ खासदारांचे समर्थन प्राप्त झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> Diwali 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिलमध्ये दाखल, जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

ब्रिटन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरायचे असल्यास कमीतकमी १०० खासदारांचा पाठिंब असणे गरजेचे आहे. सुनक यांना सध्या एकूण १४२ खासादारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे सध्या त्यांचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे सुनक यांचे प्रतिस्पर्धी असल्याचे म्हटले जात होते. विशेष म्हणजे ही निवडणूक लढवण्यासाठी ते आपल्या सुट्या रद्द करून ब्रिटनमध्ये परतले होते. मात्र रविवारी त्यांनी अचानकपणे आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे सुनक यांचा मार्ग आणखी सुकर झाला आहे.

हेही वाचा >>> ‘सबका साथ, सबका विकास’ची प्रेरणा प्रभू रामचंद्रांकडून : मोदी

जॉन्सन शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर पेनी मॉर्डन्ट यांच्याकडे सुनक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात आहे. मात्र त्यांच्याकडे सध्यातरी फक्त २९ खासदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या शर्यतीत त्यादेखील बाद होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे सुनक यांची पंतप्रदानपदी नियुक्ती होण्याची शक्यता बळावली आहे. मॉर्डन्ट यांना तेथील वेळेनुसार दुपारी २ वाजेपर्यंत १०० खासदारांचा पाठिंबा मिळाला नाही तर सुनक आपोआपच ब्रिटनचे नवे पंतप्रधान होतील.