युक्रेनच्या पूर्वेकडील सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग तयार करून देण्यासाठी तत्काळ युद्धबंदी करावी यासाठी आपण रशिया व युक्रेन या दोन्ही देशांच्या सरकारांकडे विविध माध्यमातून ‘जोरदार आग्रह’ धरला आहे, असे भारताने शनिवारी सांगितले.

 सुरक्षित आश्रयस्थानांतच राहावे आणि अनावश्यक धोका पत्करणे टाळावे अशी सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली असून, सरकार त्यांच्याबाबत चिंतित आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी सांगितले.

student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
kalyan east shinde shiv sena city chief mahesh gaikwad including nine expelled from shiv sena
कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख महेश गायकवाड; यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!
pro max level backbencher student making bhelpuri while attending lecture video went viral
“मुलांनी तर हद्द केली राव!” वर्गात शिक्षक शिकवत होते अन् मागच्या बाकावर बसून विद्यार्थी करत होते ‘हे’ काम, Video Viral

 रशियन सीमेपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुमी शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ७०० असल्याचे बागची म्हणाले.

 सुमी शहरात युद्ध व हवाई हल्ले सुरू असल्यामुळे, आपल्याला या संघर्ष क्षेत्रातून तत्काळ बाहेर काढावे, असा धोक्याचा इशारा देणारे संदेश आणि व्हिडीओ हे विद्यार्थी समाजमाध्यमांवर पाठवत आहेत.

 हे विद्यार्थी सुमी विद्यापीठाच्या वैद्यकीय संस्थेच्या वसतिगृहांमध्ये राहात असून, भारतीय दूतावास त्यांच्या नियमित संपर्कात आहे, असेही बागची यांनी सांगितले.

 रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मारिउपोल आणि वोल्नोवखा शहरांभोवती स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत तात्पुरती युद्धबंदी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने हे वक्तव्य केले आहे. तथापि, खारकिव्ह व सुमीसह जेथे शेकडो भारतीय अडकून पडले आहेत, त्या ठिकाणी तात्पुरती युद्धबंदी जाहीर झालेली नाही.