क्रायमियात रशियाच्या नेव्हीचा तळ उभारण्याच्या बदल्यात सवलतीच्या दराने गॅसचा पुरवठा करण्याचा करार करण्यात आला होता. त्यामुळे या सवलतीच्या दरातून उपलब्ध झालेले ११ अब्ज डॉलर युक्रेनने परत करावे, अशी मागणी रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी केली
आहे.
क्रायमिया हा आता रशियाचा भाग असल्याने युक्रेनकडे देणं लागतं, युक्रेनने ११ अब्ज डॉलर वाचविले आहेत आणि त्यानुसार रशियाच्या अर्थसंकल्पात त्याच ११ अब्ज डॉलरची तूट आहे, असा इशारा मेदवेदेव यांनी दिला आहे.
सत्तेवर आल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष व्हिक्टर यानुकोव्हीच यांनी २०१० मध्ये क्रायमियातील रशियाच्या काळ्या समुद्रातील ताफ्याच्या कराराला मुदतवाढ देण्याचे मान्य करण्यात आले. हा करार २०१७ मध्ये संपुष्टात येणार होता मात्र आता तो २०४२ पर्यंत वाढविण्यात आला आहे.
त्याच्या बदल्यात रशियाने युक्रेनला नैसर्गिक वायूच्या दरात प्रत्येक १००० क्युबिक मीटरसाठी १०० डॉलरची सवलत दिली होती. नवा भाडेकरार २०१७ पर्यंत अमलात येणार होता तरीही युक्रेनला २०१० पासून सवलत मिळत होती. आता क्रायमिया हा रशियाचा अधिकृत भाग झाला आहे.

Story img Loader