रशियाकडून सिरियातील बंडखोरांच्या विरोधात करण्यात येत असलेल्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करता यावे यासाठी रशियाने सिरियाला विमानभेदी क्षेपणास्त्रे पाठवली आहेत, अशी माहिती रशियन हवाईदलाच्या अधिकाऱ्याने दिली.

रशियाने सप्टेंबरमध्ये सिरियाचे राष्ट्रपती बशर असाद यांच्या विनंतीवरून सिरियातील आयसिसच्या दहशतवाद्यांवर हवाईहल्ले करण्याचा निर्णय घेतला होता. रशियाचा सिरियातील हस्तक्षेप केवळ हवाई हल्ल्यापुरताच मर्यादित असल्याचेही रशियन अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
कर्नल जनरल व्हिक्टर बोंडारेव्ह म्हणाले की, विमानभेदी क्षेपणास्त्रांमुळे रशियाच्या लढाऊ विमानांना मदतच होणार आहे. आयसिस दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास आणिबाणीच्या परिस्थितीत या क्षेपणास्त्रांमुळे रशियाला मदत मिळेल. रशियाच्या लढाऊ विमानाचे अपहरण झाल्यास सैन्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही सज्ज आहोत.
बोंडारेव्ह यांनी रशियाकडून पाठविण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचा प्रकार स्पष्ट केला नाही.

Story img Loader