अमेरिकन गुप्तचर संस्थेचा माजी हेर एडवर्ड स्नोडेन याला रशियात आणखी तीन वर्षे राहण्याची परवानगी मिळाली आहे.
गेल्या वर्षी स्नोडेनला रशियात एक वर्षांसाठी आश्रय घेण्याची हंगामी मंजुरी मिळाली होती. गेल्या १ ऑगस्ट रोजी ही मुदत संपली. स्नोडेनचा वकील अ‍ॅनाल्तोली कुचेरेना याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्नोडेनला आणखी तीन वर्षे रशियात राहता येईल, परंतु त्याला राजाश्रय देण्यात आला नसल्याचे सांगितले. नव्या मंजुरीनुसार बहाल केलेल्या कालावधीत स्नोडेनला रशियात राहण्यास कोणताही अडथळा येणार नाही आणि जर त्याला कायमस्वरूपी राहायचे झाल्यास त्यासाठी स्वतंत्र प्रक्रियेच्या माध्यमातून निर्णय घ्यावा लागेल. अर्थात हे सर्व स्नोडेनच्या इच्छेवर अवलंबून असेल, असेही कुचेरेना म्हणाले. गेल्या वर्षी हाँगकाँगहून क्यूबाला जाण्यासाठी निघालेला स्नोडेन मॉस्को विमानतळावरून अचानक गायब झाला होता. रशियन सरकारकडून आश्रय मिळण्याअगोदर त्याने विमानतळावरच एक महिना काढला होता.

Story img Loader