रशियाने युक्रेनमधील दोन शहरांपुरती युद्धबंदी जाहीर केली असली, तरी मारिउपोल शहराभोवती वेढा घालून असलेल्या रशियन फौजा युद्धबंदीचे पालन करत नसल्यामुळे शनिवारी नियोजित असलेले नागरिकांचे स्थलांतर लांबणीवर टाकण्यात आल्याचे या शहरातील अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

 सिटी कौन्सिलने एका निवेदनाद्वारे नागरिकांना शहरातील आश्रयस्थळी परतण्याचे आणि स्थलांतरबाबत पुढील सूचनेची वाट पाहण्याचे आवाहन केले आहे. रशिया काही भागांत ठरलेली युद्धबंदी पाळत नसून, मारुउपोलसारख्या आघाडीच्या शहरांतून नागरिकांना इतरत्र हलवण्याची संयुक्त योजना हाणून पाडत आहे, असे युक्रेनच्या अध्यक्षांचे सल्लागार ओलेक्सी अ‍ॅरेस्टोविच यांनी दूरचित्रवाहिनीवरील प्रक्षेपणात सांगितले.

ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय

युक्रेनच्या आग्नेयकडील मारिउपोल आणि पूर्वेकडील वोल्नोवखा या शहरांमधून नागरिकांना बाहेर पडता यावे यासाठी त्यांच्याकरता मार्ग मोकळा करण्याबाबत आपली युक्रेनी फौजांशी सहमती झाली असून, रशियन प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजेपासून ती लागू होईल असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी म्हटले होते.