जमिनीवरून अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी करून रशियाने १९८७ सालच्या महत्त्वाकांक्षी ‘आण्विक क्षेपणास्त्र करारा’चा भंग केला आहे, असा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आह़े हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादमीर पुतिन यांना सोमवारी या संदर्भात पत्रही लिहिले आह़े
तसेच, या संदर्भात रविवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री व्लादमीर पुतिन यांच्याशी चर्चाही केली़ ‘इंटरमिडिएट- रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रीटी’ (आयएनएफ) करारानुसार रशियावर असलेल्या बंधनांचे रशियाने उल्लंघन केले आहे, अशी माहिती अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली़
या करार स्वाक्षऱ्या करणाऱ्या देशांना मध्यम क्षमतेच्या क्रुस आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती आणि युद्ध चाचणी करता येत नाही़
परंतु रशियाने ५०० ते ५५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचे लक्षात आले आहे, असे एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितल़े
हे प्रकरण पहिल्यांदा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राने उजेडात आणले होत़े शीतयुद्धाच्या काळात या करारामुळे शस्त्रस्पर्धा आणि त्यातही आण्विक स्पर्धा कमी करण्यास मोठे साहाय्य झाले होत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा