Russia-Ukrainian War donald trump volodymyr zelensky Conflict : युक्रेन व रशियामध्ये चालू असलेलं युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) व्हाउट हाऊसला (अमेरिकेच्या अध्यक्षांचं निवासस्थान व कार्यालय) भेट दिली होती. या भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झेलेन्स्की यांची जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. दोघांमध्ये संभाषण चालू असताना ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचा मूर्ख अध्यक्ष (Stupid President) असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, ट्रम्प व झेलेन्स्की यांच्यातील वादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यावर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. युक्रेनचे शत्रूराष्ट्र म्हणजेच रशियाने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा