सोविएत रशियाच्या विघटनानंतर रशियात प्रथमच सर्वात मोठय़ा प्रमाणावरील लष्करी कवायतींचे आयोजन करण्यात येत असून सिबेरिया आणि अतिपूर्वेकडील क्षेत्रात एक लाख ६० हजार सैनिक आणि जवळपास पाच हजार रणगाडे तैनात करण्यात आले आहेत.रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मंगळवारी साखलीन बेटावर लष्कराच्या काही कवायतींची पाहणी केली. लष्कराची क्षमता आणि सज्जता यांना चालना देण्यासाठी या कवायतींचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या या कवायतींमध्ये रशियाच्या ताफ्यातील बारा नौका आणि १३० लढाऊ विमाने सहभागी झाली असून कवायती आठवडाभर चालणार आहेत. लष्कराच्या काही तुकडय़ा त्यांच्या मुख्य तळापासून हजारो कि.मी. दूरवर तैनात करण्यात आल्या आहेत.
या कवायती नियमित प्रशिक्षण सुसज्जतेसाठी असून त्या कोणत्याही विशिष्ट देशाला लक्ष्य करण्यासाठी केल्या जात नसल्याचे आश्वासन रशियाचे उपसंरक्षणमंत्री अनतोली अॅण्टोनोव्ह यांनी स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2013 रोजी प्रकाशित
रशियात ‘अतिभव्य’ लष्करी कवायतींचे आयोजन
सोविएत रशियाच्या विघटनानंतर रशियात प्रथमच सर्वात मोठय़ा प्रमाणावरील लष्करी कवायतींचे आयोजन करण्यात येत असून सिबेरिया आणि अतिपूर्वेकडील क्षेत्रात एक लाख ६० हजार सैनिक आणि जवळपास पाच हजार रणगाडे तैनात करण्यात आले आहेत.रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मंगळवारी साखलीन बेटावर लष्कराच्या काही कवायतींची पाहणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-07-2013 at 02:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia organized astronomical military parade