या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास रशिया सज्ज, जर्मनी, ब्रिटनसह अनेक देशांकडून निर्बंध

युक्रेनमधील दोन फुटीरवादी प्रांतांच्या स्वातंत्र्याला मान्यता दिल्यानंतर रशियाने मंगळवारी या प्रांतांशी करार करून तिथे सैन्यतैनातीचा मार्ग मोकळा केला़  त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचे ढग गडद झाले असून, पाश्चात्य देशांनीही रशियावर निर्बंधाचे सत्र आरंभले आहे.  जर्मनीने ‘नॉर्ड स्ट्रीम २’ वायुवाहिनी रोखण्याची घोषणा केली, तर ब्रिटनने पाच रशियन बँकांवर निर्बंध लागू केल़े 

युक्रेनच्या सीमेवर रशियाने सुमारे दीड लाख सैन्य तैनात केल्याचा अंदाज असून, हे दोन देश युद्धाच्या उंबरठय़ावर असताना नवी ठिणगी पडली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील डोन्टेस्क आणि लुहान्स्क या बंडखोर नियंत्रित प्रांतांना मान्यता देण्याची घोषणा केली.  पुतिन यांच्या निर्णयाबरोबरच या प्रांतांबरोबरील करारास रशियन संसदेने मान्यता दिल्याने तिथे  सैन्य तैनात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.   तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचा दावा रशियाने केला़  मात्र, रशिया शांततेच्या सबबीखाली युद्धाच्या हेतूने कारवाया करत असल्याचा आरोप अमेरिका आणि काही युरोपीय देशांनी केला आह़े

रशियाच्या आक्रमणाला तोंड देणाऱ्या युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात कोणालाही घाबरत नसल्याचे स्पष्ट केल़े त्याचवेळी त्यांनी युक्रेनच्या मित्रदेशांना ‘नि:संदिग्ध आणि प्रभावी कृती’चे आवाहन केल़े

युक्रेनमधील प्रांतांना स्वातंत्र्याचा दर्जा देण्याच्या रशियाच्या निर्णयाचा अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी निषेध केला़ या प्रांतांत गुंतवणूक, व्यापार आणि अन्य आर्थिक व्यवहार करण्यास मनाई करणारा आदेश काढला़

रशिया ते जर्मनी या ‘नॉर्ड स्ट्रीम २’ वायुवाहिनीचे प्रमाणीकरण रोखण्यात येत असल्याचे जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी जाहीर केल़े  रशियातून जर्मनीर्नयत बाल्टिक समुद्रातून जाणारा दुहेरी वायुवाहिनीचा हा रशियाचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो़  पुतिन यांच्या नियंत्रणाखालील ‘गाझप्रॉम’ कंपनीने वायुवाहिनीचे काम पूर्ण झाल्याची घोषणा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केली होती़  मात्र, जर्मनीच्या ऊर्जा नियामक संस्थेने या वायुवाहिनीच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया प्रलंबित ठेवली होती़

जर्मनीपाठोपाठ ब्रिटननेही रशियाविरोधात निर्बंधाचे पाऊल उचलल़े रशियाच्या पाच बँकांबरोबरच अन्य तिघांवर निर्बंध लागू करण्याची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी केली़ या बँकांमध्ये आयएस बँक, जनरल बँक, ब्लॅक सी बँक आदींचा समावेश आह़े युरोपीय महासंघानेही निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आह़े

हे आक्रमणच : अमेरिका

युक्रेनच्या बंडखोर नियंत्रित प्रांतात सैन्य तैनातीच्या रशियाच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध केला आह़े  हे रशियाचे युक्रेनवरील आक्रमण असल्याचे दिसत़े  युक्रेनमधील परिस्थती पाहता रशियाच्या आक्रमणाची ही नवी सुरूवात आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार जॉन फाईनर यांनी मंगळवारी सांगितल़े     रशियावर निर्बंध लागू करण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत़

भारताकडून चिंता

युक्रेन सीमेवरील वाढत्या तणावाबाबत भारताने चिंता व्यक्त केली आह़े  संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रांतील दूत टी़ एस़  तिरूमूर्ती यांनी रशिया-युक्रेन संघर्षांबाबत भूमिका मांडली़  तेथील शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करत राजनैतिक चर्चेतून प्रश्न सोडविण्याचे आवाहन त्यांनी केल़े  मात्र, युक्रेनमधील दोन प्रांतांना मान्यता देण्याच्या रशियाच्या निर्णयाबद्दल त्यांनी भाष्य केलेले नाही़ 

भारतात निवडणुकीनंतर इंधनदराचा भडका

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या उंबरठय़ावर असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रतिपिंप १०० डॉलरजवळ पोहोचल्या़  मात्र, भारतात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याचे मानले जात़े त्यामुळे निवडणुका संपताच, म्हणजे १० मार्चला निवडणूक निकालानंतर देशात इंधनभडका होण्याचे संकेत आहेत़