एपी, कीव्ह (युक्रेन) : क्रिमियामधील सेवास्टोपोलमध्ये युद्धनौकांवर युक्रेनने ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा आरोप करत रशियाने ‘युक्रेन धान्य निर्यात करारा’ला स्थगिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांच्या मध्यस्थीनंतर युरोपसह जगभरात धान्यटंचाई होऊ नये, यासाठी हा करार अस्तित्वात आला होता. 

  रशियाने हल्ल्याचे निमित्त करून करारास स्थगिती दिल्यामुळे रशियातून युरोपला होणाऱ्या धान्यनिर्यातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुसरीकडे युक्रेनने मात्र या कथित हल्ल्याचा इन्कार केला असून रशियाच्या सैनिकांकडून स्फोटके हाताळताना चूक झाल्यामुळे युद्धनौकेवर स्फोट झाल्याचा दावा केला आहे.

Story img Loader