रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह, ईशान्येकडील खार्किव्ह आणि दक्षिणेकडील खेरसन या तीन शहरांवर हल्ला करण्यासाठी आक्रमणरेषा निश्चित केल्या असून या तिन्ही शहरांच्या संरक्षणाचा निर्धार युक्रेनने व्यक्त केला. दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत काही सैनिक आणि तीन मुलांसह १९८ जणांचा मृत्यू झाल्याचे युक्रेनच्या आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तिसरं जागतिक महायुद्ध सुरू करा आणि थेट रशियन सैन्याशी आमने-सामने लढा. किंवा दुसरा म्हणजे जो देश (रशिया) आंतरराष्ट्रीय नियमच पाळत नाही, त्यांच्या विरोधात वागतोय, त्या देशाला त्यासाठी किंमत चुकवायला लावा”, असं बायडेन म्हणाले आहेत.

Live Updates

Russia Ukraine War : रविवारी रशियाने बेलारुसमध्ये दिलेली चर्चेची ऑफर युक्रेनच्या अध्यक्षांनी नाकारली आहे.

20:48 (IST) 27 Feb 2022
कॅनडाचे हवाई मार्ग रशियासाठी बंद

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे कॅनडाने रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द तात्काळ बंद केली आहे, असे कॅनडाचे परिवहन मंत्री म्हणाले.

20:28 (IST) 27 Feb 2022
पैसे संपले, खायला अन्न नाही, विमान पकडण्यासाठी १० किमीची पायपीट, डोंबिवलीतील विद्यार्थी अडकला युक्रेनमध्ये

20:26 (IST) 27 Feb 2022
पंतप्रधान मोदी उच्चस्तरीय बैठक बोलावणार

युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक बोलावणार असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.

20:04 (IST) 27 Feb 2022
विश्लेषण : स्विफ्ट नेटवर्क म्हणजे काय? रशियन बँकांच्या त्यातून हकालपट्टीचा अर्थ काय?

20:04 (IST) 27 Feb 2022
“तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत…”, युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं ‘ते’ आवाहन ज्यामुळे एलोन मस्कने केली मोठी मदत

20:02 (IST) 27 Feb 2022
युक्रेनने रशियाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचलं ; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले…

20:02 (IST) 27 Feb 2022
“…म्हणून मी युक्रेन सोडून मायदेशी परतणार नाही,” भारतीय मुलीचा निर्धार

20:01 (IST) 27 Feb 2022

20:00 (IST) 27 Feb 2022
उद्ध्वस्त होत असलेल्या युक्रेनला आता थेट एलोन मस्कची साथ, रशियाचे जोरदार हल्ले सुरू असताना केली ‘ही’ मदत

19:43 (IST) 27 Feb 2022
पुतिन यांच्याकडून रशियाच्या अण्वस्त्र विभागाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश

रशिया-युक्रनेमधील युद्ध चिघळण्याची शक्यता, जगावर अणुयुद्धाचं सावट, पुतिन यांच्याकडून रशियाच्या अण्वस्त्र विभागाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश

18:53 (IST) 27 Feb 2022
त्यांची मतदानाची शक्ती काढून घ्या

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जगाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाची मतदानाची शक्ती काढून टाकण्याचे आवाहन केलं आहे.

18:28 (IST) 27 Feb 2022
रशियाशी बेलारुसमध्ये चर्चा करण्यास युक्रेन तयार

मॉस्कोमधील बेलारूस येथे रशियाशी चर्चा करण्यास युक्रेन तयार आहे, असं वृत्त रशियन स्टेट मीडियाने दिलंय.

https://platform.twitter.com/widgets.js

17:54 (IST) 27 Feb 2022
युक्रेनने चर्चेची संधी गमावली, पुतीन यांचा इशारा

युक्रेनने चर्चेची संधी वाया घालवल्याचा आरोप पुतीन यांनी केला आहे. रशियाने चर्चेसाठी आमंत्रण दिल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी बेलारुसमध्ये चर्चेसाठी तयार नसल्याचं म्हटलं होतं.

17:36 (IST) 27 Feb 2022
रशियन सैन्याला माघारी पाठवत खार्किव शहर ताब्यात घेतलं, युक्रेनचा दावा

युक्रेनमधीन खार्किव शहरामध्ये रशियन सैन्याने प्रवेश केला होता आणि दोन्ही देशाच्या सैन्यात युद्ध सुरू होतं. परंतु रशियन सैन्याला माघारी पाठवत खार्किव शहर ताब्यात घेतलं आहे, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे.

17:00 (IST) 27 Feb 2022
साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोकांचं युक्रेनमधून पलायन

रशियाने गुरुवारी आक्रमण केल्यानंतर ३,६८,००० हून अधिक लोकांनी युक्रेनमधून पलायन केले आहे, अशी माहिती एएफपीने दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

16:35 (IST) 27 Feb 2022
युक्रेनचं मोठं पाऊल, रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात सादर केला अर्ज

“युक्रेनने रशियाच्या विरोधात आपला अर्ज आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सादर केला आहे.
आक्रमकतेने युक्रेनमध्ये नरसंहार केल्याबद्दल रशियाला जबाबदार धरले पाहिजे. तसेच आम्ही रशियाला त्वरित लष्करी कारवाई थांबवण्याचा आदेश देण्याची विनंती करतो आणि पुढील आठवड्यात याप्रकरणी सुणावणी सुरू होण्याची अपेक्षा करतो,” असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

16:27 (IST) 27 Feb 2022
केरळच्या मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

16:25 (IST) 27 Feb 2022
युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सरकारी खर्चाने परत आणणार – राजनाथ सिंह

“युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सरकारी खर्चाने देशात परत आणले जाईल. यासाठी आम्ही युक्रेनच्या शेजारील देशांच्या परवानगीने विमानांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

16:11 (IST) 27 Feb 2022
रशियाचे ४,३०० सैनिक मारले गेले, युक्रेनचा दावा

रशियन सैन्याने युक्रेनवर केलेल्या आक्रमणादरम्यान सुमारे ४,३०० सैनिक गमावले आहेत, असा दावा युक्रेनचे उप संरक्षण मंत्री हन्ना मल्यार यांनी रविवारी केला.

15:58 (IST) 27 Feb 2022
चेक रिपब्लिकचा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये रशियाशी खेळण्यास नकार

https://platform.twitter.com/widgets.js

चेक रिपब्लिकने 2022 विश्वचषक प्ले-ऑफमध्ये रशियाशी खेळण्यास नकार दिला आहे.

15:55 (IST) 27 Feb 2022
युक्रेनमध्ये अडकलेले गुजरातचे विद्यार्थी परतले मायदेशी

युक्रेनमध्ये अडकलेले गुजरातचे विद्यार्थी अहमदाबादमध्ये परतले आहेत. हे विद्यार्थी काल मुंबईला पोहोचले होते, तेथून आज अहमदाबामध्ये परतले.

https://platform.twitter.com/widgets.js

15:25 (IST) 27 Feb 2022
पुतीन यांचं ज्युदो फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून निलंबन

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आंतरराष्ट्रीय ज्युदो फेडरेशनचे (IJF) मानद अध्यक्ष म्हणून निलंबित करण्यात आले आहे, अशी घोषणा क्रीडा प्रशासकीय समितीने केली.

15:04 (IST) 27 Feb 2022
युक्रेनमधील विद्यार्थी अडचणीत – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

“खार्किव आणि किव्हमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी भारत सरकारला विनंती करतो की या विद्यार्थ्यांना सीमेजवळ आणावे जेणेकरून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. तसेच, इव्हॅक्युएशन प्लेनची संख्या वाढवायला हवी,”

https://platform.twitter.com/widgets.js

अशी मागणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली.

14:42 (IST) 27 Feb 2022
भारतीयांनी किव्हमधून पश्चिम भागात निघून जावं, युक्रेनमधील भारतीय दुतावासाचं आवाहन

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने ट्विट केले आहे की, “युक्रेन रेल्वे कोणत्याही खर्चाशिवाय आपत्कालीन गाड्यांचे आयोजन करत आहे. किव्ह येथून प्रथम या आणि जागा मिळवा या तत्त्वावर या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात वेळापत्रक रेल्वे स्थानकांवर आढळेल.”

दरम्यान, सध्याची किव्हमधील परिस्थिती पाहता अडकलेल्या भारतीय लोकांना देशाच्या पश्चिम भागात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

14:38 (IST) 27 Feb 2022
“रशियाकडून आलेली चर्चेची ऑफर स्वीकारा;” बेलारूसच्या नेत्यांची झेलेन्स्की यांना विनंती

बेलारशियन नेते अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी रविवारी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना रशियाशी चर्चा करण्याचे आवाहन केले. रशियाकडून आलेली चर्चेची ऑफर स्वीकारा, जेणेकरून तुम्ही तुमचे राज्यत्व गमावणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. रशियाच्या RIA वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

14:20 (IST) 27 Feb 2022
फिनलंडने रशियन विमानांसाठी बंद केले हवाई क्षेत्र

फिनलंड इतर युरोपीय देशांच्या राफ्टमध्ये सामील होऊन रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद करेल. फिनलंड “रशियन हवाई वाहतुकीसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची तयारी करत आहे,” असे परिवहन मंत्री टिमो हरक्का यांनी ट्विटरवर लिहिले. फिनलंडची रशियाशी ८०० मैलांची सीमा आहे.

13:34 (IST) 27 Feb 2022
रशियाशी चर्चेसाठी तयार आहे, परंतु बेलारूसमध्ये नाही – वोलोडिमिर झेलेन्स्की

रशियाशी चर्चेसाठी तयार आहे, परंतु बेलारूसमध्ये नाही, असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटलंय. .रशियाने बेलारशियन प्रदेशातून युक्रेनवर हल्ला केला नसता तर मिन्स्कमध्ये चर्चा होऊ शकली असती, असे युक्रेनचे अध्यक्ष म्हणाले.

#breaking Zelensky says ready for talks with Russia, but not in Belarus pic.twitter.com/uew5fSvJJ7
— AFP News Agency (@AFP) February 27, 2022
13:11 (IST) 27 Feb 2022
हा रशियाने केलेला आणखी एक युद्ध गुन्हा

युक्रेनच्या सैन्याने आज सकाळी बेलारशियन Tu-22 विमानातून किव्ह येथे गोळीबार करणारे “विंग रॉकेट” पाडल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलाचे कमांडर-इन-चीफ Valerii Zaluzhnyi एका निवेदनात ही माहिती दिली आहे. “हा रशियन फेडरेशन आणि रशियाने युक्रेनच्या लोकांविरोधात केलेला आणखी एक युद्ध गुन्हा आहे,” असंही ते म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js
12:42 (IST) 27 Feb 2022

रशियन सैन्याने युक्रेनच्या खार्किव शहरामध्ये प्रवेश केला आहे आणि लढाई सुरू आहे, असे प्रादेशिक प्रशासनाच्या प्रमुखांनी सांगितले.

https://platform.twitter.com/widgets.js

12:38 (IST) 27 Feb 2022
अडकलेल्या लोकांसाठी इस्कॉन मंदिराची दारं उघडली

युक्रेनमधील वाढत्या तणावादरम्यान, इस्कॉनने पूर्व युरोपीय देशातील गरजू लोकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडले आहेत. “संपूर्ण युक्रेनमधील इस्कॉनची मंदिरे गरजू लोकांच्या सेवेसाठी तयार आहेत. आमचे भक्त आणि मंदिरे संकटात सापडलेल्यांची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहेत. आमच्या मंदिराचे दरवाजे सेवेसाठी खुले आहेत”, असं कोलकाता येथील इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी शनिवारी सांगितले.