रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद जगभरात उमटू लागले आहेत. अनेक देशांनी आवाहन करून देखील रशियानं आपलं आक्रमण कायम ठेवलं आहे. दुसरीकडे नाटोशी संबंधित २८ देशांनी युक्रेनला युद्धात मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीवमध्ये धडकल्या असताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेनं देऊ केलेली मदत नाकारली आहे. कारण ही मदत युद्ध लढण्यासाठी नसून त्यांना देशाबाहेर निघण्यासाठीची होती!

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये शुक्रवारी मदतीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. एपी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वोलोडिमिर झेलेन्स्की यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्याचा ‘एक्झिट प्लान’ दिला. मात्र, यावेळी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन फौजांचा प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त करत आप कीवध्येच राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगत अमेरिकेची मदत नाकारली आहे.

Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
Putin Ukraine hating Donald Trump victory hit Europe How long will Ukraine stand strong in front of Russia
पुतिनमित्र, युक्रेनद्वेष्टे ट्रम्प यांच्या विजयाने युरोपला धडकी… रशियासमोर युक्रेन किती काळ तग धरणार?
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन

“मला दारुगोळा द्या”

रशियन फौजा कीवमध्ये शिरल्या असताना राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मात्र लढण्याचा निर्धार केला आहे. “इथे लढा सुरू झाला आहे. मला दारुगोळा हवाय, बाहेर पडण्यासाठीचा मार्ग नव्हे”, असं वोलोडिमिर झेलेन्स्की ठामपणे म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांचा लढण्याचा निर्धार कायम असल्याचं दिसून येत आहे.

“आम्ही सर्व इथे आहोत. आमचे सैन्य इथं आहे. आपल्या समाजातील नागरिक येथे आहेत. आम्ही सर्व इथे आमच्या स्वातंत्र्याचे, आमच्या देशाचे रक्षण करत आहोत, आणि कायम इथे असेच उभे राहू,” असं झेलेन्स्की राष्ट्रपती भवनाच्या बाहेर उभे राहून म्हणाले आहेत. युक्रेनच्या संरक्षण विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून झेलेन्स्की यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

“मी राजधानीतच आहे, पळून जाणार नाही”, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला निर्धार!

“मला माहिती आहे ते माझ्यासाठीच येतायत”

वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा निर्धार गेल्या दोन दिवसांत अनेक बाबतीत दिसून आला आहे. शुक्रवारी त्यांनी जारी केलेल्या एका निवेदनामध्ये आपण देश सोडून पळून जाणार नसल्याचं ठामपणे म्हटलं आहे. “शत्रूनं (रशिया) मला त्यांचा नंबर वन टार्गेट केलं आहे. माझं कुटुंब हे त्यांचं नंबर दोनचं टार्गेट आहे हेही मला माहिती आहे. त्यांना युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखालाच लक्ष्य करून युक्रेनला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायचं आहे. पण मी कुठेही पळून जाणार नाही. मी राजधानीतच राहणार आहे. माझं कुटुंब देखील युक्रेनमध्येच आहे”, असं वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटलं आहे.