रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धाचा आज १३वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर सातत्याने क्षेपणास्त्र आणि बॉम्बहल्ले सुरू आहेत. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही देशांना समोरासमोर बसून चर्चा करून युद्धावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, सोमवारी युक्रेन आणि रशियाच्या शिष्टमंडळात नियोजित तिसऱ्या फेरीची बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाल्याचं युक्रेननं म्हटलंय, तर रशिया मात्र खुश नसल्याचं दिसून येतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

VIDEO: …अन् धावत्या रशियन टँकवर चढून त्याने फडकावला युक्रेनचा झेंडा

रशिया आणि युक्रेनमधील चर्चेच्या तिसऱ्या फेरीत तिथे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी युक्रेनियन शहरांमधील मानवतावादी कॉरिडॉरवर प्रामुख्याने चर्चा झाली होती. बैठकीनंतर, रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख व्लादिमीर मेडिन्स्की म्हणाले, “या चर्चेत आमच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. परंतु पुढच्या फेरीत चांगली प्रगती होईल, अशी आम्हाला आशा आहे.”

रशियानं युक्रेनच्या रहिवाशी इमारतीवर टाकला ५०० किलोंचा बॉम्ब; परराष्ट्र मंत्री फोटो शेअर करत म्हणाले…

चर्चेनंतर युक्रेनच्या शिष्टमंडळाचे भाग असलेल्या मायखाइलो पोडोल्याक यांनी ट्विट केले की, “आज या चर्चेत मानवतावादी कॉरिडॉरच्या लॉजिस्टिकशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. तसेच युद्धबंदी आणि सुरक्षा हमीसह, नियमांच्या मूलभूत राजकीय ब्लॉकवर सखोल चर्चा सुरू आहे.”

दरम्यान, “या बैठकीत मॉस्कोच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत,” असे रशियाकडून सांगण्यात आल्याचं एजन्सी फ्रान्स-प्रेसने म्हटलंय.

Ukraine War: एकला चलो रे… युक्रेन सोडण्यासाठी ११ वर्षाच्या मुलाने एकट्याने केला एक हजार किमीचा प्रवास

“रशिया मध्ययुगीन काळातील युद्धांची आठवण करून देणारी रणनीती अवलंबत आहे, शहरांना वेढा घालत आहे, बाहेर पडण्याचे मार्ग बंद करत आहे आणि नागरिकांना शस्त्राने वार करून ठार मारत आहे,” असे जोनाथन गिम्बलेट यांनी सांगितले. ते युक्रेनने मॉस्कोविरुद्धच्या युद्ध-गुन्ह्यांचा दावा करण्यासाठी नियुक्त केलेले वकील आहेत.

‘पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?;’ संतापलेल्या इम्रान खान यांचा भर सभेत सवाल

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, “आताच काहीतरी सकारात्मक बोलणं खूप घाईचं होईल. पुढच्या वेळी चर्चेत काही महत्वाचे प्रश्न सुटतील, अशी आशा आहे, असं मेडिन्स्की म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia ukraine third round talks makes progress over human corridor hrc
Show comments