Russia Ukraine War News : रशियाने युक्रेनमध्ये विध्वंसक हल्ले बुधवारी आणखी तीव्र केल़े. आठवडय़ाभरात शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या असून, दोन हजार नागरिकांचा बळी गेल्याची माहिती युक्रेन सरकारने दिली़. त्यात दोन्ही देशांच्या मृत सैनिकांचा समावेश केल्यास युद्धबळींचा आकडा वाढणार असून, उभय देशांनी दुसऱ्या फेरीतील शांतता चर्चेची तयारी दर्शवली असली तरी ठिकाणाबाबत अनिश्चतता आह़े.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रशिया-युक्रेन यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर रशियाने कीव्हबरोबरच, खार्कीव्ह आणि अन्य मोठय़ा लोकसंख्येच्या शहरांना लक्ष्य करत हल्लासत्र तीव्र केल़े. खार्कीव्हमधील पोलीस आणि गुप्तवार्ता विभागाच्या मुख्यालयावर बुधवारी बॉम्बहल्ला करण्यात आला. पंधरा लाख लोकसंख्येच्या या शहरातील निवासी भागांवर हल्ले वाढविण्यात आले आहेत़. चेर्नीहीव शहरात क्षेपणास्त्र हल्ल्यात एक रुग्णालय उद्ध्वस्त करण्यात आले. तर चेर्नीहीव शहरात झालेल्या रशियाच्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ढिगाऱ्यातून किमान २२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे युक्रेनियन आपत्कालीन विभागाने म्हटले आहे.
Russia Ukraine War Live Updates: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया ‘मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग’ तयार करत असल्याचा निर्वाळा रशियन राजदूतांकडून देण्यात आला आहे.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, युद्ध थांबवण्याचा एकमेव मार्ग पुतिन यांच्याशी थेट चर्चा करण्याचा प्रयत्न आहे, असे एएफपीच्या वृत्तात म्हटले आहे.
युक्रेनच्या उत्तरेकडील २८०,००० लोकसंख्या असलेल्या चेर्निहाइव्ह शहरातील निवासी भागावर रशियन हल्ल्यात किमान २२ नागरिक ठार झाले आहेत. बचावकर्ते ढिगाऱ्यांमधून आणखी मृतदेह शोधत असल्याने जीवितहानी जास्त असू शकते, असे एपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या एका सहाय्यकाने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे युक्रेनचा संपूर्ण ताब्यात घेण्याचे उद्दिष्ट आहे. मॅक्रॉन आणि पुतिन यांनी ९० मिनिटांचे फोनवरुन संभाषण केल्यानंतर काही तासांनंतर त्यांच्या सहाय्यकाने हे विधान केले आहे.
उत्तर युक्रेनच्या चेर्निहाइव्ह शहरावर रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार झाल्याची माहिती एएफपी न्यूज वृत्तसंस्थेने राज्यपालांच्या हवाल्याने दिली आहे.
Nine dead after Russian forces strike northern Ukrainian city of Chernihiv: AFP News Agency quotes Governor
— ANI (@ANI) March 3, 2022
युक्रेनियन शिष्टमंडळ बेलारूसमध्ये रशियासोबत चर्चेसाठी हेलिकॉप्टरने पोहोचले आहे, अशी माहिती रॉयटर्ने रशियन राज्य वृत्तसंस्था TASS च्या हवाल्याने दिली आहे.
The Ukrainian delegation of negotiators has arrived by helicopter for talks with the Russian side in Belarus, Russian state news agency TASS: Reuters #russianukrainiancrisis
— ANI (@ANI) March 3, 2022
किव्हमधील भारतीय दूतावासाने खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना तातडीने एक फॉर्म भरण्यास सांगितले आहे.
All Indian Nationals who are in KHARKIV excluding PISOCHYN, please fill up details contained in the form on an urgent basis: https://t.co/hm5ayU5UgC
— India in Ukraine (@IndiainUkraine) March 3, 2022
बेलारूस-पोलंड सीमेवर रशियाशी शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी उच्च-स्तरीय युक्रेनियन शिष्टमंडळ जात आहे, अशी पुष्टी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या सल्लागाराने गुरुवारी केली.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी ९० मिनिटे फोनवर संवाद साधला, असे एलिसी पॅलेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. “फ्रान्स रशियन लोकांच्या पाठीशी उभा आहे असून त्यांना हे युद्ध नको आहे”, असं मॅक्रॉन यांनी बुधवारी एका ट्विटमध्ये म्हटलंय.
“युक्रेन संकटावर तोडगा निघेल यात मला शंका नाही. रशिया-युक्रेन यांच्यात चर्चा गुरुवारी व्हायला हवी,” असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटलंय.
आम्ही युक्रेनची पुनर्बांधणी करून पुन्हा उभं करू. रशिया आता आमच्या देशात जो विनाश घडवतंय, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असं वक्तव्य युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलंय. Ukraine War: “आम्ही युक्रेनला पुन्हा उभं करू अन् रशियाला…”; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी घेतली शपथ
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रोमानियाला गेलेले नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये, रोमानियाच्या महापौरांनी मंत्री शिंदे यांना अडवत या भारतीय विद्यार्थ्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आम्ही केली होती, तुम्ही नाही असे म्हटले आहे. वाचा सविस्तर…
युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा व्लादिमीर पुतिन यांनी केल्यापासून त्याच्याविरोधात जगभरात आंदोलने केली जात आहेत. रशियामध्येही मोठ्या प्रमाणात पुतिन यांनी शेजारच्या देशावर चढवलेल्या हल्ला फारसा लोकांना पटलेला नाही. त्यामुळेच रशियामधूनही पुतिन यांना विरोध केला जातोय. याच विरोधाचा एक अजब नमुना नुकताच एका रशियन उद्योजकाच्या पोस्टमधून पहायला मिळाला. या रशियन उद्योजकाने पुतिन यांना जिवंत अथवा मृत अवस्थेत आपल्या समोर आणणाऱ्यास १ मिलियन अमेरिकन डॉलर्स (साडेसात कोटी रुपये) देण्याची ऑफर दिलीय. पुतिन यांना जिवंत अवथा मृत पकडून आणणाऱ्याला बक्षीस देण्याची ही ऑफर अॅलेक्स कोनानिखिन या उद्योजकाने दिलीय. पुढे वाचा.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर लाखो लोक सुरक्षित स्थळांच्या शोधात शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेत आहेत. यामध्ये पोलंड, हंगेरी, बल्गेरिया, मोल्दोव्हा आणि रोमानियासारख्या देशांच्या नेत्यांनी युक्रेनियन नागरिकांचे स्वागत केले आहे. पण दुसरीकडे २०१५ मध्ये अशीच परिस्थिती उद्धभवलेली असताना पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतून, विशेषत: सीरियामधून स्थलांतरितांना अशी वागणूक दिली गेली नव्हती. युरोपीय नेत्यांनी या स्थलांतरितांना विरोध दर्शवला होता. याबद्दल काही स्थलांतरितांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथे वाचा.
रशिया युक्रेन युद्धाचे संपूर्ण जगात पडसाद उमटत आहेत. अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियाविरोधात मोहीम तीव्र केली आहे. रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात आहेत. दुसरीकडे संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत रशियाच्या बाजूने मतदान करणारे आणि तटस्थ असणाऱ्या देशांच्या भूमिकेकडे अमेरिकेने मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत रशियाच्या विरोधात १४१ देशांनी मतदान केलं. पाच देशांनी रशियाच्या बाजून मतदान केलं. तर भारतासह ३५ देशांनी तटस्थ भूमिका घेतली होती. २०१६ पासून भारत हा रशियन शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयातदार आहे. काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सॅन्क्शन्स अॅक्ट (CAATSA) अंतर्गत रशियाकडून S-400 ट्रायम्फ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी भारतावर निर्बंध लागू करायचे की नाही याचा विचार अमेरिकेतील बायडेन प्रशासन करत आहे, असे अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी डोनाल्ड लू यांनी सांगितले. पुढे वाचा.
भारतीय बँकेने हे स्पष्ट केले आहे की ते आंतरराष्ट्रीय निर्बंधाखालील रशियन संस्थांसोबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणार नाहीत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एसबीआयने आपल्या काही ग्राहकांना पत्र पाठवून माहिती दिली आहे की, यूएस, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध यादीमध्ये समाविष्ट असलेल्या बँका, बंदरे आणि जहाजांशी त्यांनी कोणताही व्यवहार करणार नाही. पुढे वाचा.
रशियन सीमेजवळील युक्रेनमधील ईशान्येकडील शहर सुमी येथील सुमी विद्यापीठात अडकलेल्या ४०० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की युद्ध सुरू झाल्यापासून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. भारतीय दूतावासाने त्यांना जागेवर राहण्यास सांगितले आहे परंतु सरकारकडे त्यांच्यासाठी काही निर्वासन योजना आहे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यापीठातील आठ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे भारत सरकारला त्यांची सुटका करण्याची विनंती केली. पुढे वाचा.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी काल रात्री आपल्या भाषणात व्लादिमीर पुतिन यांच्या रशियन सैन्याचे मनोबल सतत खालावत असल्याचा दावा केला आणि त्यांच्या सैन्याने आतापर्यंत ९,००० आक्रमणकर्त्यांना ठार मारलं असल्याचं सांगितलं. ते पुढे म्हणाले,”सर्व बंदिवान फक्त एकच सांगतात: ते इथे का आहेत हे त्यांना माहीत नाही. शत्रूचे मनोधैर्य सतत खालावत आहे. झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याने अन्न आणि पुरवठ्यासाठी हताश होऊन लुटल्याचा आरोपही केला. पुढे वाचा.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनला सध्या अनेक देशांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. दरम्यान आता जर्मनी युक्रेनला आणखी २,७०० क्षेपणास्त्रे पुरवणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर पॅरिसमधील ग्रेविन म्युझियममधून त्यांचा पुतळा हटवण्यात आला. पॅरिसमधील ग्रेविन संग्रहालयाचे संचालक म्हणाले, “आम्ही ग्रेविन संग्रहालयात हिटलरसारख्या हुकूमशहाचे प्रतिनिधित्व केले नाही. त्यामुळे आता आम्ही पुतिनचे यांचे प्रतिनिधित्व करू इच्छित नाही.” यासंदर्भात एएफपी या वृत्तसंस्थेने वृत्त दिलंय. पुढे वाचा.
VIDEO: Wax statue of Vladimir Putin removed from Paris museum.
— AFP News Agency (@AFP) March 3, 2022
Russia's invasion of Ukraine prompts director of the Grevin Museum in Paris to remove the statue.
"We have never represented dictators like Hitler in the Grevin Museum, we don't want to represent Putin today" pic.twitter.com/vaN3kOPPzP
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की, बुखारेस्ट, सुसेवा, कोसीस, बुडापेस्ट आणि रझेझो येथून ३,७२६ भारतीय आज १९ स्वतंत्र विमानांमधून भारतात पोहोचणार आहेत.
With all hands on deck & the direction of PM @narendramodi Ji, we will get 3726 of our people back home today. Jai Hind! #OperationGanga https://t.co/83Rg0c9lAk
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 3, 2022
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या एका जुन्या मालिकेची लोकप्रियता कमालीची वाढत आहे. युक्रेनमध्ये प्रचंड हिट झालेली ही तीन सीझन असलेली मालिका झेलेन्स्की राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अधिक लोकप्रिय झाली आणि आता युद्धकाळात तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. झेलेन्स्की स्टुडिओज या कंपनीच्या व्यवस्थापकीय भागीदार निकोला सॉडरलंड यांनी गेल्या काही दिवसात या मालिकेच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाल्याचं सांगितलं. सविस्तर वाचा.
युक्रेन आणि रशियामध्ये गुरुवारी शांतता चर्चेची दुसरी फेरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.बुधवारी, रशियाचे सर्वोच्च वार्ताकार व्लादिमीर मेडिन्स्की म्हणाले की रशियन शिष्टमंडळ नैऋत्य बेलारूसमध्ये वाट पाहत होते आणि युक्रेनियन प्रतिनिधी त्यांच्या मार्गावर होते. मेडिन्स्की यांनी असेही सांगितले की रशियन सैनिकांनी युक्रेनियन प्रतिनिधींसाठी “सुरक्षा कॉरिडॉर” तयार केला आहे. बेलारूसने सांगितले की दोन्ही बाजू पोलंड आणि बेलारूसच्या सीमेवरील प्राचीन बियालोवीझा जंगलात चर्चेसाठी भेटतील, परंतु युक्रेनियन प्रतिनिधीने सांगितलं की चर्चा होईल पण ठिकाण वेगळं असेल.
मार्च २०२१ मध्ये पहिल्यांदा भेटल्याच्या एका वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज क्वाड नेत्यांच्या बैठकीत सामील होणार आहेत. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या वेळीच नेमकी ही बैठक घेण्यात येत आहे, ज्यावेळी भारत परराष्ट्रसंबंध विषयक पेचप्रसंगात सापडला आहे. कारण दोन्ही युद्धग्रस्त राष्ट्रांशी भारताचे संबंध आहेत.
रशिया-युक्रेन दरम्यानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना रशियावर अनेक निर्बंध लादत आहेत. यामध्ये आता रशियन प्रजातीच्या मांजरींचा देखील समावेश झाला आहे. मांजरींशी संबंधित असलेल्या फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फेलाइन्स (FIFe) ने रशियन जातीच्या मांजरांच्या निर्यात आणि नोंदणीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. मांजरींवरील हे निर्बंध ३१ मेपर्यंत लागू असतील. पुढे वाचा.
रशियन सैनिकांनी दक्षिणेकडील खेरसन शहर ताब्यात घेतल्याची माहिती युक्रेनच्या प्रशासनाने दिली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या आठव्या दिवशी खेरसन शहर रशियाच्या ताब्यात गेले.एएफपी या वृत्तसंस्थेने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. खेरसन हे काळ्या समुद्रावर वसलेले एक महत्त्वाचे बंदर शहर आहे.
युक्रेनमध्ये बांगलादेश शिपिंग कॉर्पोरेशनच्या बांगलार समृद्धी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ल्यात बांगलादेशी खलाशाचा मृत्यू झाला. रशिया-युक्रेन संघर्षात बांगलादेशी जहाज ओल्व्हिया बंदरात अडकल्याची माहिती आहे. रशियन नौदल दलाने बांग्लार समृद्धी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केला.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे नेटफ्लिक्सने रशियामधल्या कन्टेन्टवर निर्बंध आणले आहेत. भविष्यातले रशियन चित्रपट, वेब सिरीज, यांचं काम थांबवलं आहे.
नेटफ्लिक्स सध्या चार रशियन कार्यक्रमांवर काम करत आहे. त्यापैकी एक क्राईम थ्रिलर आहे, ज्याचं शूटिंग आता थांबवण्यात आलं आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेननं ओलिस ठेवल्याची माहिती समोर आली होती. मात्र ही माहिती म्हणजे केवळ अफवाच असल्याचं स्पष्टीकरण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. युक्रेनमधला भारतीय दूतावास तिथल्या भारतीय नागरिकांच्या सातत्याने संपर्कात आहे. युक्रेन प्रशासनाच्या सहकार्याने अनेक जणांनी खारकीव्ह सोडलं आहे. आम्हाला विद्यार्थ्यांना ओलिस ठेवल्याविषयीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. बचावकार्य सातत्याने सुरू आहे, असं सांगत ही केवळ अफवाच असल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
Our response to media queries regarding reports of Indian students being held hostage in Ukraine ⬇️https://t.co/RaOFcV849D pic.twitter.com/fOlz5XsQsc
— Arindam Bagchi (@MEAIndia) March 3, 2022
रशियाच्या युक्रेनवर आक्रमण सुरू झाल्यापासून आतापर्यंत ७,००० हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत, तर वरिष्ठ अधिकार्यांसह शेकडो लोकांना कैद करण्यात आले आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या लष्करी सल्लागाराने बुधवारी सांगितले. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन सैन्याच्या कमांडरला गंभीर जखमी झाल्यानंतर बेलारूसला नेण्यात आले, सल्लागार ओलेक्सी अरेस्टोविच यांनी एका टेलिव्हिजन ब्रीफिंगमध्ये सांगितले.
काही दिवसांपूर्वी अलीपोव्ह यांनी भारतातील रशियाचे राजदूत म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांनी अद्याप भारतीय राष्ट्रपतींचीही अधिकृत भेट घेतलेली नाही. या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, की या संदर्भात रशिया भारताशी सातत्याने संपर्क ठेवून आहे. खारकीव्ह, समी आणि परिसरातील संघर्षग्रस्त भागात रशियन भूमीवरून भारतीयाचे सुरक्षित स्थलांतर करण्यात येईल. त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल मी त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून भारताच्या या संदर्भातील भावना मी समजू शकतो.
युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दुसऱ्यांदा संवाद साधला़ युक्रेनमधून भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याच्या मोहिमेबाबत मोदी यांनी पुतिन यांच्याशी चर्चा केली. याआधी उभय नेत्यांमध्ये २४ फेब्रुवारीला चर्चा झाली होती. त्यावेळी हिंसाचार थांबवून राजनैतिक चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचे आवाहन मोदी यांनी पुतिन यांना केले होत़े.