Russia Ukraine War News : रशियाने युक्रेनमध्ये विध्वंसक हल्ले बुधवारी आणखी तीव्र केल़े. आठवडय़ाभरात शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या असून, दोन हजार नागरिकांचा बळी गेल्याची माहिती युक्रेन सरकारने दिली़. त्यात दोन्ही देशांच्या मृत सैनिकांचा समावेश केल्यास युद्धबळींचा आकडा वाढणार असून, उभय देशांनी दुसऱ्या फेरीतील शांतता चर्चेची तयारी दर्शवली असली तरी ठिकाणाबाबत अनिश्चतता आह़े.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रशिया-युक्रेन यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर रशियाने कीव्हबरोबरच, खार्कीव्ह आणि अन्य मोठय़ा लोकसंख्येच्या शहरांना लक्ष्य करत हल्लासत्र तीव्र केल़े. खार्कीव्हमधील पोलीस आणि गुप्तवार्ता विभागाच्या मुख्यालयावर बुधवारी बॉम्बहल्ला करण्यात आला. पंधरा लाख लोकसंख्येच्या या शहरातील निवासी भागांवर हल्ले वाढविण्यात आले आहेत़. चेर्नीहीव शहरात क्षेपणास्त्र हल्ल्यात एक रुग्णालय उद्ध्वस्त करण्यात आले. तर चेर्नीहीव शहरात झालेल्या रशियाच्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ढिगाऱ्यातून किमान २२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे युक्रेनियन आपत्कालीन विभागाने म्हटले आहे.

Live Updates

Russia Ukraine War Live Updates: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया ‘मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग’ तयार करत असल्याचा निर्वाळा रशियन राजदूतांकडून देण्यात आला आहे.

08:01 (IST) 3 Mar 2022
भारतीयांच्या स्थलांतरासाठी रशियाकडून ‘मानवतावादी मार्ग’

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया ‘मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग’ तयार करत असल्याचा निर्वाळा रशियन राजदूतांकडून देण्यात आला आहे. युक्रेन-रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे चार हजार भारतीय अडकून पडले असून, त्यात बहुतांश वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताने रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर रशियातर्फे हा निर्वाळा देण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर रशियाचे भारतातील नवे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी स्पष्ट केले, की, रशिया भारतीयांच्या युक्रेनमधून सुरक्षित स्थलांतरासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग तयार करत आहे. युक्रेनच्या खारकीव्ह शहरात रशियाच्या हल्ल्यात २१ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी रशिया करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे वाचा.

07:49 (IST) 3 Mar 2022
‘तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर’

तिसरे महायुद्ध झाले तर अण्वस्त्रांचा वापर होईल, असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव यांनी बुधवारी दिला़. युक्रेन-रशिया यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असताना लाव्हरोव यांनी ‘अल जजीरा’ला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केल़े. तिसरे महायुद्ध हे विध्वंसक अणुयुद्ध असेल, या त्यांच्या युद्धखोर विधानामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आह़े.

काही दिवसांपूर्वी अलीपोव्ह यांनी भारतातील रशियाचे राजदूत म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांनी अद्याप भारतीय राष्ट्रपतींचीही अधिकृत भेट घेतलेली नाही. या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, की या संदर्भात रशिया भारताशी सातत्याने संपर्क ठेवून आहे. खारकीव्ह, समी आणि परिसरातील संघर्षग्रस्त भागात रशियन भूमीवरून भारतीयाचे सुरक्षित स्थलांतर करण्यात येईल. त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल मी त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून भारताच्या या संदर्भातील भावना मी समजू शकतो.

युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दुसऱ्यांदा संवाद साधला़ युक्रेनमधून भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याच्या मोहिमेबाबत मोदी यांनी पुतिन यांच्याशी चर्चा केली. याआधी उभय नेत्यांमध्ये २४ फेब्रुवारीला चर्चा झाली होती. त्यावेळी हिंसाचार थांबवून राजनैतिक चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचे आवाहन मोदी यांनी पुतिन यांना केले होत़े.