नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केली असताना खार्कीव्ह शहरात मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामुळे युक्रेनमधून परतण्यासाठी मदतीची याचना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपुढील संकट अधोरेखित झाले असून, देशापुढे वेगवान मदतकार्याचे आव्हान उभे ठाकले आह़े
नवीन शेखरप्पा ज्ञानगौडा (२१) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून, तो मूळचा कर्नाटकातील हावेरी जिल्ह्याचा रहिवासी होता, असे कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयुक्त मनोज रंजन यांनी सांगितले. नवीन हा वैद्यकीयच्या चौथ्या वर्षांत शिकत होता. एका दुकानासमोर रांगेत उभा असताना हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
परराष्ट्र मंत्रालयाने नवीन याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देत विद्यार्थ्यांसह भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेला गती देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन याच्या वडिलांशी संपर्क करून शोक व्यक्त केला.
युक्रेनच्या खार्कीव्ह आणि अन्य युद्धग्रस्त शहरांतून भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्याबाबत रशिया आणि युक्रेनच्या दूतावासाबरोबरच उभय देशांतील भारतीय दूतावासांशी संपर्कात आहेत. युद्धग्रस्त भागांतून भारतीयांना सुरक्षित बाहेर पडू देण्याबाबत २४ फेब्रुवारीपासून या दोन्ही देशांकडे वारंवार मागणी करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या रशियाच्या बिलगोरोड शहरात भारतीय बचाव पथक तैनात करण्यात आले आहे, मात्र खार्कीव्ह आणि शेजारील शहरांतील युद्धस्थिती मदतकार्यात मोठा अडथळा ठरत आह़े खार्कीव्ह शहरात रशिया आणि युक्रेन सैन्यांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. तेथील बिघडती परिस्थिती चिंतेची बाब असून, सर्व भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे हंगेरी, ज्योतिरादित्य िशदे हे रोमानिया, किरेन रिजीजू हे स्लोव्हाकीया आणि जनरल व्ही़ क़े सिंह यांना पोलंडमध्ये पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी भारतीय दूतावासाने मंगळवारी नव्या मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या. कीव्ह शहरातून तातडीने बाहेर पडावे, त्यासाठी रेल्वेमार्ग किंवा अन्य उपलब्ध वाहतूक साधनाचा वापर करावा, अशी सूचना दूतावासाने भारतीयांना केली.
विद्यार्थ्यांची व्यथा
युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मदतीची याचना करत आहेत. अनेकांनी समाजमाध्यमांद्वारे कैफियत मांडली. तिथे विद्यार्थ्यांना मारहाण, धक्काबुक्की करण्यात येत असल्याचे समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या काही चित्रफितींमधून स्पष्ट झाले. युक्रेनमधून नुकतीच मध्य प्रदेशातील गुना येथे परतलेली विद्यार्थिनी श्रुती नायक हिने त्यास पुष्टी देत भीतीदायक अनुभव कथन केला. युद्धग्रस्त भागांतून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा युक्रेनचे सैनिक छळ करत असून, अनेकांना मारहाण करण्यात आल्याचे तिने सांगितले.
हवाई दल मदतकार्यात
युक्रेनमधील भारतीयांसाठीच्या मदतकार्यात सहभागी होण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला केली़. त्यानुसार हवाई दल ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत आपली विमाने मतदकार्यात सहभागी करणार असून, एका फेरीत ३०० जणांची वाहतूक करता येईल़. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत विमानाच्या नऊ फेऱ्या झाल्या असून, हवाई दलामुळे ही मोहीम वेगाने राबविणे शक्य होईल, असे मानले जात़े
पंतप्रधानांकडून पुन्हा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा उच्चस्तरीय बैठक घेऊन ‘ऑपरेशन गंगा’मधील विमान फेऱ्या आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा आढावा घेतला़. या विषयावर रविवारपासून मोदींची ही चौथी बैठक होती़. सर्व भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असेल, याचा पुनरुच्चार मोदी यांनी या बैठकीत केला.
नवीन ज्ञानगौडा
नवीन हा मूळचा कर्नाटकचा़ खार्कीव्ह राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठात एमबीबीएसच्या चौथ्या वर्षांत तो शिकत होता़ मंगळवारी रशियाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला़ त्याचा मृतदेह भारतात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आल़े
युद्धस्थिती
* रशियन सैन्याकडून हल्लासत्र तीव़ खार्कीव्हमध्ये तोफांचा मारा, गोळीबारात मोठी जिवीतहानी़ कीव्हमध्ये ६० किमीपर्यंत रणगाडय़ांचा ताफा़
* किव्ह शहरात आणखी लक्ष्यभेदी हल्ल्यांचा रशियाचा इशारा़ नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना़
* युक्रेनमधून आतापर्यंत ६ लाख ७७ हजार नागरिकांचे शेजारच्या देशांत स्थलांतर * युरोप युक्रेनबरोबर आहे, हे सिद्ध करण्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे युरोपीय संसदेतील भाषणात आवाहन