Russia Ukraine Crisis Live: रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. युक्रेनशी झालेल्या तीव्र सैनिकी संघर्षांनंतर या प्रकल्पातील एका इमारतीस मोठी आग लावण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला. आगीमुळे मोठय़ा आण्विक दुर्घटनेच्या धोक्याने जगभर भीतीची लाट पसरली होती. परंतु ही इमारत या प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्र असून तेथील आग आटोक्यात आणण्यात आली. आगीनंतर या प्रकल्पातून किरणोत्सर्ग पसरलेला नाही, असा निर्वाळा संयुक्त राष्ट्रांच्या आण्विक प्रकल्पविषयक निरीक्षकांनी दिला.

दक्षिण युक्रेनमध्ये युद्धाची तीव्रता वाढली आहे. येथील मारियुपॉल, चेर्निहाइव्ह आणि खार्किव्ह येथे गोळीबार, क्षेपणास्त्र मारा सातत्याने सुरु आहे. खेर्सन शहरावर रशियाने ताबा मिळवला आहे. तर दुसरीकडे अझोव्ह समुद्रावरील मोक्याच्या बंदराच्या सीमेवर असणाऱ्या मारियुपोल शहरामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. काळ्या समुद्राच्या बंदरातील स्थानिक सरकारी मुख्यालय रशियाने ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला युक्रेनियन अधिकाऱ्यांचा दुजोरा दिलाय. आठवड्याभरात युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिकांचे शेजारी देशांमध्ये स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिलीय.

Live Updates

Russia Ukraine War Live updates:युक्रेनमधील महत्वाचं शहर असलेल्या मारियुपोलमध्ये रशियन सैन्याने नाकेबंदी केल्याची माहिती तिथल्या महापौरांनी दिली आहे.

21:02 (IST) 5 Mar 2022
युक्रेनमधून आतापर्यंत १३ हजार ३०० भारतीय सुखरूप परतले

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्याचे कार्य सुरूच आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० नागरिक भारतात सुखरूप परतले आहेत. मागील २४ तासांमध्ये आणखी १५ विमानांद्वारे २ हजार ९०० जण आले असून, पुढील २४ तासांसाठी १३ विमाने नियोजित आहेत. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

19:55 (IST) 5 Mar 2022
भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आम्ही वचनबद्ध - रशिया

भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी सांगितले की, रशियाने भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शेकडो बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि रशियन बाजूशी समन्वय साधण्यासाठी भारतीय दूतावासातील मुत्सद्दींचा एक गट बेलग्रेडला पाठवण्यात आला आहे. प्रश्न नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचा आहे आणि रशियच्या बस त्या भागात जाऊ शकत नाही. आमच्या बसेस या भागांच्या जवळ आहेत. आम्हाला भारतीय नागरिकांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित करावे लागेल.

19:53 (IST) 5 Mar 2022
पंतप्रधान मोदी थोड्यात वेळात घेणार उच्चस्तरीय बैठक

युक्रेन संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच उच्चस्तरीय चर्चा करणार आहेत. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती गंभीर झाली असून अनेक भारतीय नागरिक अजूनही युद्धग्रस्त भागात अडकले आहेत.

19:47 (IST) 5 Mar 2022
रशियावरील निर्बंध म्हणजे युद्धाची घोषणा - पुतिन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन म्हणाले की, रशियाविरुद्ध निर्बंध म्हणजे युद्धाची घोषणा आहे. त्याच वेळी, युक्रेनवर नो-फ्लाय झोन लादण्याचा कोणताही प्रयत्न रशियाविरुद्ध युद्ध मानला जाईल, असेही ते म्हणाले.

19:04 (IST) 5 Mar 2022
सर्व भारतीयांनी खार्किव सोडले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

पिसोचिन आणि खार्किव मधून, आम्ही पुढील काही तासांत सर्वांना बाहेर काढण्यात सक्षम होऊ. आतापर्यंत मला माहित आहे की खार्किवमध्ये कोणीही शिल्लक राहिले नाही. मुख्य लक्ष आता सुमीवर आहे, आव्हान कायम आहे. सर्वोत्तम पर्याय असेल युद्धविराम आहे, असे

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.

18:04 (IST) 5 Mar 2022
रशियाची अमेरिकेकडून लेखी आश्वासनाची मागणी

अमेरिकेच्या निर्बंधांचा इराणबरोबरच्या सहकार्यावर परिणाम होणार नाही, यासंदर्भात रशियाने अमेरिकेकडून लेखी आश्वासनाची मागणी केली आहे, असे वृत्त TASS ने रशियाचे परराष्ट्र मंत्री, सर्गेई लावरोव्हच्या हवाल्याने दिलंय.

17:49 (IST) 5 Mar 2022

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमध्ये सुमारे १६ हजार परदेशी सैनिक येण्याची अपेक्षा आहे. क्रोएशियातील काही सैनिक आधीच पोलंडमार्गे देशात दाखल झाले आहेत आणि युक्रेनच्या दक्षिण पूर्वेतील अनियंत्रित युनिट्समध्ये सामील झाले आहेत, अशी माहिती रशियन दूतावासाने दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

16:54 (IST) 5 Mar 2022

सेवा इंटरनॅशनल युरोपमधील विनोद बी पिल्लई युक्रेनमधील लोकांना अन्न आणि राहण्याची सोय करून देत मदत करत आहेत. "आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वयंसेवक आहोत जे भारतीयांसह सर्वांना मदत करत आहेत. आतापर्यंत भारतीयांसह ३० हजार हून अधिक लोकांना मदत करण्यात आली आहे," असं त्यांनी सांगितलं.

https://platform.twitter.com/widgets.js

16:11 (IST) 5 Mar 2022
गेल्या आठवड्यात ६ हजार भारतीयांची युक्रेनमधून सुटका, ज्योतिरादित्य सिंधियांची माहिती

गेल्या आठवड्यात ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून रोमानिया आणि मोल्दोव्हाधून मधील ६२२२ भारतीयांना बाहेर काढले, अशी माहिती मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

15:56 (IST) 5 Mar 2022

युक्रेनमधील सुमी येथील भारतीय विद्यार्थ्यांबद्दल आम्हाला खूप काळजी आहे. आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यासाठी तात्काळ युद्धबंदीसाठी अनेक माध्यमांद्वारे रशियन आणि युक्रेनियन सरकारांवर जोरदार दबाव आणला आहे, असे अरिंदम बागची, एमईएचे प्रवक्ते यांनी ट्विटमध्ये सांगितले.

https://platform.twitter.com/widgets.js

14:37 (IST) 5 Mar 2022
रशिया आणि बेलारूस बाल्टिक सागरी राज्यांच्या परिषदेतून निलंबित

युरोपियन युनियनने रशिया आणि बेलारूसला बाल्टिक सागरी राज्यांच्या परिषदेतून निलंबित केले.

13:48 (IST) 5 Mar 2022
सुमीमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी संभाव्य मार्ग शोधत आहोत, दूतावासाची माहिती

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने शनिवारी सांगितले की ते पूर्व युक्रेनियन सुमी शहरातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्व संभाव्य मार्गांचा शोध घेत आहेत.

12:19 (IST) 5 Mar 2022
रशियाकडून युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा

रशियाने युक्रेनच्या मारियुपोल आणि वोलनोवाखा येथील नागरिकांसाठी बाहेर काढू देण्यासाठी तात्पुरता युद्धविराम घोषित केला आहे, असे वृत्त रशियाचे मीडिया आउटलेट स्पुतनिकने दिले आहे. (सविस्तर वृत्त वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

https://platform.twitter.com/widgets.js

11:34 (IST) 5 Mar 2022
नवीनचा मृतदेह आणण्याचे प्रयत्न सुरू, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

यूक्रेनमध्ये गोळीबारात मरण पावलेला एमबीबीएसचा विद्यार्थी नवीन शेखरप्पाचा मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत, याप्रकरणी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशीही बोललो, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

11:29 (IST) 5 Mar 2022
युद्धाला विरोध करत रशियन वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी दिला ऑन एअर राजीनामा

रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धाला अनेक रशियन लोकांचा देखील विरोध आहे. युद्धाला नकार देत रशियाच्या एक आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी ऑन एअर राजीनामा दिला आहे. (सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

10:52 (IST) 5 Mar 2022
जी ७ राष्ट्रांच्या गटांची रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात भूमिका

युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यासंदर्भात जी ७ या राष्ट्रांच्या गटांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात भूमिका घेतलीय. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा या सात राष्ट्रांचा गट असणाऱ्या जी सेव्हनमधील राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रशियाने युक्रेनमधील युद्धासंदर्भात महत्वाचं भाष्य केलंय. सविस्तर वृत्त येथे वाचा

10:32 (IST) 5 Mar 2022
नॅशनल मेडिकल कमिशनचा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय

युद्धामुळे युक्रेनमधून भारतीय वैद्यकीय विद्यार्थी मायदेशी परतत आहेत. त्यामुळे नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) परदेशी वैद्यकीय पदवीधरांना कोविड आणि युद्धासारख्या परिस्थितीमुळे अपूर्ण इंटर्नशिप राहिलेल्या विद्यार्थ्यांना FMGE पास केल्यास भारतात पूर्ण इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

09:34 (IST) 5 Mar 2022
झेलेन्स्की यांची नाटोवर टीका

युक्रेनच्या हवाई क्षेत्राला निषिद्ध क्षेत्र (नो फ्लाय झोन) जाहीर करण्यास किंवा त्यावर देखरेख ठेवण्यास ‘नाटो’ने शुक्रवारी नकार दिला. याच मुद्द्यावरुन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी एका भवनिक भाषणामध्ये नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेनवर (नाटो) कठोर शब्दात टिका केलीय. सविस्तर वृत्त येथे वाचा

09:28 (IST) 5 Mar 2022
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आज अमेरिकन सिनेटर्सशी बोलणार

युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आज शनिवारी अमेरिकन सिनेटर्सशी व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलवर बोलतील.

09:27 (IST) 5 Mar 2022
एका आठवड्यात रशियाने ५०० क्षेपणास्त्र डागली

युक्रेनवर संपूर्ण आक्रमण सुरू झाल्यापासून रशियाने आठवड्यात ५००हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. रशिया दररोज सुमारे दोन डझन सर्व प्रकारची क्षेपणास्त्रे हल्ल्यासाठी वापरत आहे, अशी माहिती पेंटागॉनच्या अधिकाऱ्याने दिल्याचं वृत्त युक्रेनच्या द कीव्ह इंडिपेंडंटने दिलंय.

https://platform.twitter.com/widgets.js

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क कार्यालयाने शुक्रवारी सांगितले की २४ फेब्रुवारीपासून रशियाने आक्रमण सुरू केल्यापासून युक्रेनमध्ये ३३१ नागरिक ठार झाले. त्यात १९ मुलांचा समावेश आहे. तर जखमींची संख्या ६७५ आहे. युद्धबळी आणि जखमींची संख्या अधिक असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.

Story img Loader