Russia Ukraine War News Today, 7 March: रशिया युक्रेन युद्धाचा आज १२वा दिवस आहे. त्यातच आता रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनला आवाहन केले आहे. रशियाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या तरच युक्रेनवरील लष्करी कारवाई थांबवण्यात येईल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रविवारी सांगितले. पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांची तुलना त्यांनी युद्धाशी केली.

दरम्यान, रशियन सैन्याने वेढा दिलेल्या मारियुपोल या बंदरांच्या शहरामध्ये युद्धविराम पाळण्याचा दुसरा प्रयत्नही रविवारी फोल ठरला. युद्धग्रस्त भागातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले. याचे खापर रशियन समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनचे लष्कर यांनी एकमेकांवर फोडले. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आजपर्यंत तो देश सोडणाऱ्यांची संख्या सुमारे १५ लाखांहून अधिक झाली आहे. युक्रेनच्या नागरिकांनी युरोपातील शेजारी राष्ट्रांमध्ये आश्रय घेतला आहे.

Live Updates

Russia Ukraine War Live updates : रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केले. तेव्हापासून आतापर्यंत ११ हजारहून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा, युक्रेनच्या संरक्षण दलाने केला.

17:57 (IST) 7 Mar 2022
युक्रेन आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री १० मार्च रोजी तुर्कीमध्ये भेटणार

युक्रेनचे आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री १० मार्च रोजी तुर्कीमध्ये भेटणार आहेत. युक्रेनचे मिन दिमित्रो कुलेबा आणि रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी तुर्कीच्या किनारीभागातील अंटाल्या प्रांतात भेटीची तयारी दर्शवली आहे.

17:52 (IST) 7 Mar 2022
सात विशेष विमानांद्वारे १ हजार ३१४ भारतात परतले

भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत, आज युक्रेनच्या शेजारील देशांमधून सात विशेष विमानांद्वारे १ हजार ३१४ भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे. यासह, २२ फेब्रुवारीपासून विशेष उड्डाणे सुरू झाल्यापासून आजपर्यंत १७ हजार ४०० हून अधिक भारतीयांना परत आणण्यात आले आहेत. अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

16:42 (IST) 7 Mar 2022
रशिया-युक्रेनदरम्यान युद्धासंदर्भात चर्चेसाठी होणार बैठक

रशिया-युक्रेन शिष्टमंडळाची बैठक २ तासांत सुरू होण्याची शक्यता आहे. रशियन शिष्टमंडळ सध्या ब्रेस्ट, बेलारूस येथे युक्रेनची वाट पाहत आहे, असं वृत्त रशियन मीडिया आरटीने दिलंय.

https://platform.twitter.com/widgets.js

15:39 (IST) 7 Mar 2022
मोदींनी केली रशियाचं कौतुक

मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करण्याचे आवाहन केले. पीएम मोदींनी युक्रेनच्या काही भागांमध्ये रशियाने केलेल्या युद्धविराम आणि मानवतावादी कॉरिडॉरच्या घोषणेचे कौतुक केले आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

15:34 (IST) 7 Mar 2022
पंतप्रधान मोदींचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी संवाद

पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. फोन कॉल सुमारे ५० मिनिटे चालला. त्यांनी युक्रेनमधील विकसित परिस्थितीवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनियन आणि रशियन संघांमधील वाटाघाटींच्या स्थितीबद्दल माहिती दिली, अशी माहिती सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

14:32 (IST) 7 Mar 2022
दक्षिण कोरिया रशियाच्या मध्यवर्ती बँकेसोबतचे व्यवहार थांबवणार

रशियाविरुद्ध अतिरिक्त निर्बंधांचा एक भाग म्हणून रशियाच्या मध्यवर्ती बँकेसोबतचे व्यवहार निलंबित करण्यात दक्षिण कोरिया युनायटेड स्टेट्स आणि इतरांमध्ये सामील होईल, असे देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले. संबंधित सरकारी एजन्सींशी सल्लामसलत केल्यानंतर मंजुरीचे अधिक तपशील जाहीर करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. यापूर्वी, दक्षिण कोरियाने सात प्रमुख रशियन बँकांसह आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली होती.

14:15 (IST) 7 Mar 2022
मुलीला पाहून आईला अश्रू अनावर

युद्धग्रस्त युक्रेनमधून दिल्ली विमानतळावर परतलेल्या मुलीला पाहून आईला अश्रू अनावर झाले. “माझ्या मुलाला घरी परतताना पाहून मला किती आनंद झाला हे शब्दात व्यक्त करता येणार नाही." असं त्या म्हणाल्या.

https://platform.twitter.com/widgets.js

12:36 (IST) 7 Mar 2022
मोदींनी युक्रेन सरकारचे मानले आभार

युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार मानले. सुमीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये पंतप्रधानांनी युक्रेन सरकारकडून पाठिंबा मागितला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

12:23 (IST) 7 Mar 2022
पंतप्रधान मोदींची युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर बातचीत

पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. फोन कॉल सुमारे ३५ मिनिटे चालला. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली असून पंतप्रधानांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या थेट संवादाचे कौतुक केले. अशी माहिती भारत सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

11:19 (IST) 7 Mar 2022
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीवरून रशियाने केली युद्धबंदी

फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विनंतीवरून मानवतावादी कॉरिडॉर उघडण्यासाठी रशियन सैन्याने युक्रेनमध्ये युद्धविराम घोषित केला, अशी माहिती एएनआयने स्पुतनिकच्या हवाल्याने दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

10:49 (IST) 7 Mar 2022
पंतप्रधान मोदी पुतिन यांच्याशी फोनवर बोलणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर बोलणार आहेत, अशी माहिती केंद्र सरकारच्या सुत्रांनी दिल्याचं वृत्त एएनआयने दिलंय.

https://platform.twitter.com/widgets.js

10:46 (IST) 7 Mar 2022
रशियाकडून अनुभवी सीरियन सैनिकांची भरती, अमेरिकेचा आरोप

रशिया युक्रेनवरील हल्ले वाढवण्यासाठी लढाईत अनुभवी सीरियन सैनिकांची भरती करत आहे, असा आरोप अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त दिलंय.

10:14 (IST) 7 Mar 2022
चीनने रशियाला रोखावं, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचं आवाहन

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी चीनला रशियाला रोखण्याचे आवाहन केले आहे. चीनने जागतिक शांततेला चालना देण्याच्या आपल्या घोषणेवर कृती करत रशियाने युक्रेनवरील आक्रमण थांबवावं, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात सामील व्हायला पाहिजे, असं ऑस्ट्रलियाच्या पंतप्रधानांनी म्हटलंय.

09:43 (IST) 7 Mar 2022
पाच श्वानांसह युक्रेनमधून भारतात परतला तरुण

युद्धग्रस्त युक्रेनमधून आज सकाळी परत आलेल्या रणजीत रेड्डीने त्याच्यासोबत पाच श्वान आणले आहेत. तो म्हणाला, "आम्हाला भारतीय दूतावासाच्या प्रयत्नांचे कौतुक करावे लागेल. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. मला माझे कुत्रे माझ्यासोबत आणण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची विशेष परवानगी मिळाली. मी पाच कुत्रे सोबत आणले आहेत."

https://platform.twitter.com/widgets.js

09:37 (IST) 7 Mar 2022
रशियाने मायकोलायव्हवर फेकले बॉम्ब

सोमवारी पहाटे रशियन सैन्याने मोक्याच्या दक्षिणेकडील युक्रेनियन बंदर शहर मायकोलायव्हवर जोरदार बॉम्बहल्ला सुरू केला आहे.

09:30 (IST) 7 Mar 2022
पंतप्रधान मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी बोलणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून बोलणार आहेत, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

09:22 (IST) 7 Mar 2022
अमेरिका, युरोपियन देशांमध्ये रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याबाबत चर्चा

युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन सहयोगी देश रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहेत, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी रविवारी सांगितले.

08:52 (IST) 7 Mar 2022
युक्रेनमध्ये आतापर्यंत ३६०हून अधिक नागरिक मारले गेले

२४ फेब्रुवारी रोजी रशियन सैन्याने आक्रमण केल्यापासून युक्रेनमध्ये किमान ३६४ नागरिक ठार झाल्याची पुष्टी झाली आहे आणि ७५९ जखमी झाले आहेत. खरी संख्या जास्त असू शकते, असे संयुक्त राष्ट्राच्या देखरेख मिशनने रविवारी सांगितले.

08:36 (IST) 7 Mar 2022
रशियाने युक्रेनचा अणु प्रकल्पावर पकड घट्ट केली

युक्रेनच्या झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पावर कब्जा करणार्‍या रशियन सैन्याने आता येथील कर्मचारी त्यांच्या आदेशाखाली ठेवले आहेत. या कर्मचाऱ्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तोडण्यात आला आहे, असं संयुक्त राष्ट्र अणु वॉचडॉगने रविवारी सांगितले. यासंदर्भात रॉयटर्सने वृत्त दिलंय.

08:25 (IST) 7 Mar 2022
नेटफ्लिक्सने रशियातील सेवा थांबवली

Netflix Inc ने रशियातील आपली सेवा निलंबित केली आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने रविवारी सांगितले. या आठवड्याच्या सुरुवातीला, नेटफ्लिक्सने रशियामधील भविष्यातील सर्व प्रकल्प तात्पुरते थांबवले होते. परंतु आता त्यांनी सेवा निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे, यासंदर्भात रॉयटर्सने वृत्त दिलंय.

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनधील इमारतीची झालेली अवस्था (Photo - Reuters)

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने रविवारी युद्धग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याच्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेचा शेवटचा टप्पा सुरू केला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी हंगेरीची राजधानी बुडापेस्टमधील हंगेरिया सिटी सेंटरमध्ये पोहोचण्याचे आवाहन केले आहे.

Story img Loader