रशियाने युक्रेनमधील दोन शहरांपुरती युद्धबंदी जाहीर केली असली, तरी मारिउपोल शहराभोवती वेढा घालून असलेल्या रशियन फौजा युद्धबंदीचे पालन करत नसल्यामुळे शनिवारी नियोजित असलेले नागरिकांचे स्थलांतर लांबणीवर टाकण्यात आल्याचे या शहरातील अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.
सिटी कौन्सिलने एका निवेदनाद्वारे नागरिकांना शहरातील आश्रयस्थळी परतण्याचे आणि स्थलांतरबाबत पुढील सूचनेची वाट पाहण्याचे आवाहन केले आहे. रशिया काही भागांत ठरलेली युद्धबंदी पाळत नसून, मारुउपोलसारख्या आघाडीच्या शहरांतून नागरिकांना इतरत्र हलवण्याची संयुक्त योजना हाणून पाडत आहे, असे युक्रेनच्या अध्यक्षांचे सल्लागार ओलेक्सी अॅरेस्टोविच यांनी दूरचित्रवाहिनीवरील प्रक्षेपणात सांगितले.
Russia Ukraine Conflict Live: रशियाने युक्रेनमधील दोन शहरांपुरती युद्धबंदी जाहीर केली असली, तरी मारिउपोल शहराभोवती वेढा घालून असलेल्या रशियन फौजा युद्धबंदीचे पालन करत नसल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.
रशियन सैन्याने विनित्सावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दिली आहे. या हल्ल्यात विनित्सा विमानतळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. याशिवाय किव्हमध्ये येणाऱ्या इरपिनमधील नागरिकांवर रशियन सैन्याने गोळीबार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
Ukraine's President Volodymyr Zelensky said that Russian rockets had completely destroyed the civilian airport of the central-western region capital of Vinnytsia: Reuters pic.twitter.com/BW55krXXTJ
— ANI (@ANI) March 6, 2022
रशियन सैन्याने युक्रेन बंदर शहर ओडेसा येथे बॉम्बफेक करण्याची तयारी केली आहे, असं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले.
Zelensky (President of Ukraine) says Russian forces preparing to bombard Ukraine port city Odessa: AFP pic.twitter.com/jwhqSkBRr3
— ANI (@ANI) March 6, 2022
ऑपरेशन गंगा अंतर्गत, आज २१३५ भारतीयांना युक्रेनच्या शेजारील देशांमधून ११ विशेष विमानांद्वारे परत आणण्यात आले आहे. यासह, २२ फेब्रुवारी रोजी विशेष उड्डाणे सुरू झाल्यापासून १५,९०० हून अधिक भारतीयांना परत आणण्यात आले आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली.
Under #operationganga, 2135 Indians have been brought back today by 11 special civilian flights from Ukraine’s neighbouring countries. With this, more than 15, 900 Indians have been brought back since the special flights began on 22nd February, 2022: Ministry of Civil Aviation pic.twitter.com/N9TZdZ2QrX
— ANI (@ANI) March 6, 2022
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी काही वेळापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी युद्धात मध्यस्थी करण्यासंदर्भात चर्चा केल्याचं कळतंय. या दोन्ही नेत्यांमधील गेल्या काही दिवसांतील ही तिसरी चर्चा आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताच्या दूतावासाने बुडापेस्ट, हंगेरी येथे एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
The Embassy of India sets up a control room in Budapest, Hungary to coordinate the evacuation of Indians stranded in Ukraine pic.twitter.com/JFKGXwn8hi
— ANI (@ANI) March 6, 2022
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सोलच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले की, “युक्रेनवरील रशियन आक्रमणास प्रभावीपणे पाठिंबा दिल्याबद्दल बेलारूसवर दक्षिण कोरिया निर्यातबंदी लादणार आहे.”
युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेनुसार, झिटोमिरमधील कोरोस्टेन मेट्रो स्टेशनजवळ रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत.
क्राइमियामध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा एक गट रशिया-युक्रेन संकटाच्या दरम्यान दिल्लीला परतला. “क्राइमियामधील परिस्थिती सामान्य आहे. महाविद्यालयांनी आम्हाला ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे,” असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
A group of Indian students studying in Crimea returns to Delhi apprehending tensions amid Russia-Ukraine crisis
— ANI (@ANI) March 6, 2022
Situation in Crimea is normal, we left to be on the safer side as it lies b/w Russia & Ukraine. Colleges have allowed us to attend online classes, the students say. pic.twitter.com/sznbgoL6a2
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रेडिओ फ्री युरोप/रेडिओ लिबर्टीने रशियामधील त्यांचे कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ब्लूमबर्ग न्यूज, बीबीसी, सीएनएन इंटरनॅशनल आणि एबीसी न्यूजने रशियामध्ये रिपोर्टिंग थांबवले आहे.
रविवारी सकाळी मारियुपोल आणि वोलनोवाखा येथे मानवतावादी कॉरिडॉर पुन्हा उघडले जातील, असा दावा रशियाने केला आहे.
रशियन सैन्याने आतापर्यंत दोन युक्रेनियन अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतले आहेत आणि ते तिसऱ्या प्रकल्पाच्या दिशेने पुढे जात आहेत, असे युक्रेनच्या अध्यक्षांनी शनिवारी यूएस सिनेटर्सशी केलेल्या कॉल दरम्यान सांगितले. झेलेन्स्की म्हणाले की, “सध्या धोक्यात असलेला तिसरा प्लांट युझनौक्रेन्स्क अणुऊर्जा प्रकल्प आहे, जो मायकोलायव्हच्या उत्तरेस १२० किलोमीटर अंतरावर आहे.”
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी “सुरक्षा, युक्रेनला आर्थिक पाठबळ आणि रशियाविरुद्ध निर्बंध सुरू ठेवण्याबाबत” चर्चा केली.
Ukraine's President Volodymyr Zelensky talked to US President Joe Biden about “the issues of security, financial support for Ukraine and the continuation of sanctions against Russia,” as per his tweet.
— ANI (@ANI) March 6, 2022
युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलेल्या २१० भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान बुखारेस्ट, रोमानिया येथून दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर पोहोचले.
Indian Air Force flight carrying 210 Indians evacuated from Ukraine arrives at Hindan airbase near Delhi from Bucharest, Romania. pic.twitter.com/CZAXHIuGcF
— ANI (@ANI) March 6, 2022
रशियाशी युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमधून बाहेर पडलेल्या लोकांची संख्या आता १४ लाख ५० हजारांवर पोहचली असल्याचे स्थलांतरितांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने म्हटले आहे.
युक्रेनमधून निर्गमन केलेले लोक ज्या देशांमध्ये पोहचले, त्या देशांतील सरकारच्या मंत्रालयांनी दिलेल्या आकडेवारीच्या आधारे संयुक्त राष्ट्र स्थलांतर संस्थेने (यूएन मायग्रेशन एजन्सी- आयओएम) ही संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार, ७,८७,३०० लोक पोलंडमध्ये गेले आहेत. सुमारे २.२८,७०० लोक मोल्दोवात, १,४४,७०० लोक हंगेरीमध्ये, १,३२,६०० लोक रुमानियात, तर १,००,५०० लोक स्लोव्हाकियात पोहचले आहेत.