Ukraine Russia War Live Updates: युद्धामुळे युक्रेनमधून बाहेर पडलेल्या लोकांची संख्या १७ लाखांहून अधिक झाली असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक संस्थेने म्हटले आहे.२४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून इतर देशांमध्ये आश्रय घेतलेल्या लोकांची संख्या सुमारे १७ लाख ३५ हजार असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक उच्चायुक्तांनी (यूएनएचसीआर) सोमवारी सांगितले. रविवारी हीच संख्या १५ लाख ३० हजार होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाहेर पडलेल्या लोकांपैकी जवळपास तीन पंचमांश, म्हणजे सुमारे १० लाख ३० हजार लोक पोलंडमध्ये, १ लाख ८० हजार लोक हंगेरीमध्ये, तर १ लाख २८ हजार लोक स्लोव्हाकियात गेले आहेत.

Live Updates

Russia Ukraine War Live: सोमवारी युक्रेन आणि रशियाच्या शिष्टमंडळात नियोजित तिसऱ्या फेरीची बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाल्याचं युक्रेननं म्हटलंय, तर रशिया मात्र खुश नसल्याचं दिसून येतंय.

16:36 (IST) 8 Mar 2022
रशियाकडून युद्धबंदीचं उल्लंघन, युक्रेनचा आरोप

रशियाने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयााने केला आहे. रशियन सैन्य आता झापोरिझ्झिया ते मारियुपोलपर्यंत मानवतावादी कॉरिडॉरवर गोळीबार करत आहेत. ८ ट्रक ३० पेक्षा जास्त बसेस मारियुपोलला मानवतावादी मदत पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना झापोरिझ्झियाला हलवण्यासाठी सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

16:34 (IST) 8 Mar 2022
युक्रेनमधून २० लाख निर्वासितांचं पलायन, संयुक्त राष्ट्रांची माहिती

युक्रेनमधून पलायन करणार्‍या निर्वासितांची संख्या मंगळवारी २० लाखांपर्यंत पोहोचली. दुसऱ्या महायुद्धानंतरचं युरोपने पाहिलेलं हे सर्वात मोठं आणि वेगवान निर्वासन असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलंय.

15:52 (IST) 8 Mar 2022
निवडणुकांमुळे तेलांच्या किमतीवर नियंत्रण नाही – केंद्रीय मंत्री

निवडणुकांमुळे सरकारने तेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवले असे म्हणणे योग्य नाही…आम्ही आमच्या उर्जेच्या गरजा पूर्ण होतील याची काळजी घेऊ, असंही हरदीप सिंग पुरी म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

15:15 (IST) 8 Mar 2022
तेलाच्या किमती जागतिक किमतीनुसार ठरवल्या जातात – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री

https://platform.twitter.com/widgets.js

देशात तेलाच्या किमती जागतिक किमतीनुसार ठरवल्या जातात. जगाच्या एका भागात युद्धसदृश परिस्थिती आहे. या परिस्थितीत तेल कंपन्यांना निर्णय महत्वाचा ठरेल. आम्ही आमच्या नागरिकांच्या हिताचे निर्णय घेऊ, असं हरदीप सिंग पुरी, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणाले.

14:51 (IST) 8 Mar 2022
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ब्रिटिश संसदेला संबोधित करणार

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की मंगळवारी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये व्हिडिओ लिंकद्वारे ब्रिटीश खासदारांना संबोधित करतील. दुसर्‍या देशाच्या अध्यक्षांनी मुख्य वेस्टमिन्स्टर चेंबरला संबोधित करण्याची पहिलीच वेळ आहे.

13:48 (IST) 8 Mar 2022
युक्रेनच्या सुमीमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मानवतावादी कॉरिडॉर तयार

युक्रेनच्या उपपंतप्रधान इरीना वेरेश्चुक यांनी सांगितले की, “मानवतावादी कॉरिडॉरच्या स्थापनेवर रशियाबरोबर झालेल्या करारानुसार नागरिकांनी युक्रेनियन सुमी शहर सोडण्यास सुरुवात केली आहे.”

13:14 (IST) 8 Mar 2022
सुमीमध्ये बॉम्बस्फोटात ९ जणांचा मृत्यू

युक्रेन शहर सुमी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएफपीने दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

13:01 (IST) 8 Mar 2022
रशियाने २०० शाळा केल्या नष्ट

रशियन क्षेपणास्त्रांनी राजधांनी किव्ह जवळील झायटोमिरमधील एक शाळा उद्ध्वस्त केली आहे. सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्याने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रशियन सैन्याने आतापर्यंत २०२ शाळा, ३४ रुग्णालये आणि १,५०० हून अधिक निवासी इमारती नष्ट केल्या आहेत, असं वृत्त युरोमैदान प्रेसने दिलंय.

11:42 (IST) 8 Mar 2022

पीएम मोदींनी अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या अध्यक्षांशी चर्चा केली. केंद्रीय मंत्री देखील या प्रक्रियेत समन्वय साधण्यासाठी शेजारच्या देशांमध्ये गेले आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हमीरपूर, हिमाचल प्रदेश येथे बोलताना दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

11:06 (IST) 8 Mar 2022
10:13 (IST) 8 Mar 2022
मानवतावादी कॉरिडोरसाठी युद्धबंदीची घोषणा

मानवतावादी कॉरिडोरसाठी ८ मार्च रोजी रशियन फेडरेशनने युद्धबंदी घोषित केली आहे, असे भारतातील रशियन दूतावासाने म्हटले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

09:58 (IST) 8 Mar 2022
जागतिक बँकेकडून युक्रेनला ७२ कोटी ३० लाख डॉलर्सचं कर्ज मंजूर

युक्रेनला ७२ कोटी ३० लाख डॉलर्सचं दशलक्ष अनुदान आणि कर्ज वित्तपुरवठा मंजूर केला आहे, असं जागतिक बँकेने म्हटलंय.

09:28 (IST) 8 Mar 2022
“आम्ही इथेच आहोत आणि लढतोय”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा नवा व्हिडीओ

“आम्ही सर्व किव्हमध्येच आहोत आणि आम्ही लढत आहोत. मी लपत नाहीये, मी किव्हमध्येच आहे, मी कोणालाच घाबरत नाही”, असं झेलेन्स्की यांनी नवीन व्हिडिओमध्ये म्हटलंय.

09:24 (IST) 8 Mar 2022
खार्किव्हमध्ये हवाई हल्ल्यात ८ ठार, २०० जखमी

७-८ मार्चच्या रात्री रशियाने खार्किव्हवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर खार्किव्हमध्ये आठ लोक ठार झाले आणि २०० लोक जखमी झाले आहेत. “सव्वासात वाजता खार्किव्ह शहरावर एक मोठा हवाई बॉम्बस्फोट झाला, ज्यामुळे बहुमजली निवासी इमारती, प्रशासकीय इमारती, वैद्यकीय संस्था, शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे पूर्णपणे किंवा अंशतः नष्ट झाली असून त्यांना आग लागली.” अशी माहिती राज्य आपत्कालीन सेवेने दिली आहे.

09:04 (IST) 8 Mar 2022
IBMने रशियातील व्यवसाय केले बंद

युक्रेनमधील संघर्षामुळे मल्टिनॅशनल टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन IBM ने रशियातील आपले सर्व व्यवसाय बंद केले आहेत, असे सीईओ अरविंद कृष्णा यांनी सांगितले.

https://platform.twitter.com/widgets.js

09:02 (IST) 8 Mar 2022
२०० भारतीयांना घेऊन विमान मायदेशी परतले

युक्रेनमधून २०० भारतीयांना घेऊन एक विशेष विमान रोमानियातील सुसेवा येथून दिल्लीत उतरले.”आम्ही बसमधून प्रवास करत असताना, कोणतेही बॉम्बस्फोट झाले नाहीत. सरकार आणि आमच्या दूतावासाने आम्हाला खूप मदत केली, आम्हाला परत आल्याने खूप आनंद झाला आहे,” असे युक्रेनमधून परतलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले.

https://platform.twitter.com/widgets.js

09:00 (IST) 8 Mar 2022
रशियन जनरल मारले गेले, युक्रेनचा दावा

युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खार्किवच्या आसपासच्या लढाईत एक रशियन जनरल मारले गेले आहेत,असे युक्रेनच्या लष्करी गुप्तचर संस्थेने सांगितले. आक्रमण सुरू झाल्यापासून या शहरावर रशियन सैन्याने कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची ओळख मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह, अशी आहे. दरम्यान, युक्रेनच्या दाव्यावर रशियाने प्रतिक्रिया दिलेली नाही.

https://platform.twitter.com/widgets.js
08:56 (IST) 8 Mar 2022
तिसऱ्या फेरीतही तोडगा नाहीच!

रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धाचा आज १३वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर सातत्याने क्षेपणास्त्र आणि बॉम्बहल्ले सुरू आहेत. दरम्यान, सोमवारी युक्रेन आणि रशियाच्या शिष्टमंडळात नियोजित तिसऱ्या फेरीची बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाल्याचं युक्रेननं म्हटलंय, तर रशिया मात्र खुश नसल्याचं दिसून येतंय. सविस्तर वाचा –

Russia Ukraine War: तिसऱ्या फेरीतही तोडगा नाहीच! युक्रेन सकारात्मक; तर नाखुश रशिया म्हणतंय, “मॉस्कोच्या…”

08:50 (IST) 8 Mar 2022
रशिया सर्वाधिक निर्बंध असणारा जगातला पहिला देश

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशिया हा जगातला सर्वाधिक निर्बंध असणारा पहिला देश बनला आहे. रशियाने इराण आणि उत्तर कोरियाला मागे टाकले आहे. रशियावर सध्या २,७७८ निर्बंध लादले गेले आहेत, असा अहवाल ब्लूमबर्गने http://Castellum.ai या डेटाबेसचा हवाला देऊन दिला आहे.

इरपिनमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर कारखाना आणि दुकानं जळाली. (फोटो: एपी)

रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारीला आक्रमण केलं होतं. आज युद्धाचा १३वा दिवस असून दोन्ही देशांमध्ये अजून युद्ध थांबवण्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा ही मोहीम अद्यापही सुरूच आहे.