Russia Ukraine War News Updates : रशियन सैन्य सतत पुढे सरकत असून, युक्रेनियन भूमीवर हल्ला करत आहे. रशियन सैन्य आता राजधानी किव्हपासून थोड्याच अंतरावर असल्याचे वृत्त आहे. युक्रेनियन सैनिक त्यांना कसे तरी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी वाटाघाटी करण्याच्या रशियाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची संपत्ती लवकरच जप्त केली जाऊ शकते. २७ देशांची युरोपियन युनियन या संदर्भात कराराच्या अगदी जवळ पोहोचली आहे. लक्झेंबर्गचे परराष्ट्र मंत्री जीन एसेलबोर्न यांनी शुक्रवारी हा दावा केला. तसेच युक्रेन सरकारने शुक्रवारी दावा केला की, रशियाने पिवडेनीच्या काळ्या समुद्रातील बंदराजवळ दोन विदेशी जहाजांवर गोळीबार केला.
Russia Ukraine War News : शुक्रवारी रशियाने किव्हवर हल्ला केल्याचे वृत्त फेटाळले असून आणि रशियन सैन्य नागरी भागांना लक्ष्य करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये साताऱ्यातील आठ विद्यार्थी अडकले आहेत. वैद्यकीय तसेच अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक मित्रमंडळी अस्वस्थ आहेत. आशिष वीर (विरवडे ता. कराड )हा विद्यार्थी कालच परत आला आहे. तर, प्रतिक्षा आरबुडे (कराड )आशुतोष राजेंद्र भुजबळ , राधिका संजय वाघमारे ,सौरभ बाळासाहेब जाधव, (कालचौंडी ता माण) संदीप यादव,सुभाष द्विवेदी (नवीन एमआयडीसी सातारा)योगेश जयपाल महामुनी( वडूज ता खटाव) ओंकार जयसिंह शिंदे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये आणखी विद्यार्थी वाढण्याची शक्यता आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून रशियाने त्यांच्या देशावर केलेल्या आक्रमणाची माहिती दिली.
ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती ठाणे जिल्हा आपत्ती निवारण कक्षाद्वारे देण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी आपत्ती निवारण कक्षातर्फे शुक्रवारी काही मदत क्रमांक जाहीर करण्यात आले होते. या मदत क्रमांकांद्वारे जिल्हयातून आतापर्यंत ३१ पालकांनी त्यांची मुले युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे.
Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले
हंगेरीतील भारतीय दूतावासाने युक्रेनमधून हंगेरीमार्गे भारतीयांना बाहेर काढण्याबाबत भारतीयांना सल्ला जारी केला आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा निषेध म्हणून पोलंड पुढील महिन्यात रशियाविरुद्ध फुटबॉल विश्वचषक पात्रता फेरीचा सामना खेळणार नाही, असे पोलिश फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षांनी शनिवारी सांगितले. फेडरेशनचे अध्यक्ष सेजरी कुलेजा यांनी ट्विटरवर ही घोषणा केली आणि संकेत दिले की पोलंड या प्रकरणावर इतर फेडरेशनशी बोलून फिफासमोर एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
"माझी फ्रेंच समकक्षांशी चर्चा झाली आहे, रशियावर निर्बंध लादण्यासाठी फ्रान्स स्विफ्टला पाठिंबा देतो. रशियन आक्रमण रोखण्यासाठी मी ताबडतोब युरोपियन युनियनने निर्बंधांचे तिसरे पॅकेज सादर करण्याचा आग्रह केला आहे,” असे युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा म्हणाले.
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियन सैन्य युक्रेनची राजधानी किव्हकडे वेगाने पुढे सरकच आहे. सैन्य आता किव्ह शहराच्या केंद्रापासून फक्त ३० किमी अंतरावर आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलांनी देशभरात जोरदार प्रतिकार सुरू ठेवला आहे.
एएफपीच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, १००,००० युक्रेनियन नागरिकांनी सीमा ओलांडून पोलंडमध्ये प्रवेश केला आहे. तर रशियन हल्ल्यात १९८ नागरिक ठार, १००० हून अधिक जखमी झाले आहेत.
रशियन आक्रमणामुळे युक्रेनमधील इंटरनेट सेवेवर वाईट परिणाम झाला आहे. देशाच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील भागांमध्ये जिथे सर्वात जास्त युद्ध सुरु आहे तिथे मोठ्या प्रमाणात इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे, असे रॉयटर्सने नेटब्लॉक्सच्या हवाल्याने सांगितले.
युक्रेनमधील गोंधळाच्या दरम्यान, झारखंड सरकार झारखंडमध्ये परत येणाऱ्या राज्यातील लोकांसाठी त्यांच्या वैयक्तिक खर्चातून तिकिटाची रक्कम परतफेड करेल. राज्यातील सर्व जनतेला सर्वतोपरी मदत देण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे.
पोलंड युक्रेनच्या पाठीशी आहे, आम्ही रशियन आक्रमणाचा निषेध करतो. युक्रेनियन लोक खूप देशभक्त आहेत जे त्यांच्या देशासाठी लढत आहेत, असे मत पोलंडचे भारतातील राजदूत अॅडम बुराकोव्स्की यांनी व्यक्त केले.
“संपूर्ण भारत सरकार सर्वांना बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे आणि जोपर्यंत आम्ही शेवटच्या व्यक्तीला बाहेर काढत नाही तोपर्यंत आमचे ध्येय पूर्ण होणार नाही. तुमच्या आयुष्यात २६ फेब्रुवारी हा दिवस लक्षात ठेवा," असे रोमानियातील भारतीय राजदूत राहुल श्रीवास्तव यांनी म्हटले.
रशियाच्या हल्ल्यानंतर हजारो भारतीय सध्या युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यामधे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्यांमध्ये रत्नागरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी तीन देवरूख येथील आहेत. अद्वैत कदम, साक्षी नरोटे, जान्हवी शिंदे तसेच एक रत्नागिरीतील विद्यार्थिनी मुस्कान सोलकर अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे चारही विद्यार्थी खारकिव येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. खारकिव मधे परिस्थिती चिघळली असून विद्यार्थ्यांना बंकर्स मधे सुरक्षितरित्या हलवले गेले आहे. सध्या या विद्यार्थ्यांकडे तीन ते चार दिवस पुरेल इतकाच अन्न धान्याचा साठा शिल्लक आहे. युक्रेन प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची काळजी घेतली जात असली तरी युद्ध परिस्थितीचा अंदाज घेत सुरक्षित ठिकाणी किंवा भारतात परत आणावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी अडचणीत आले आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र युक्रेनमधील भारतीय दूतावासाने तातडीने पावले उचलत युक्रेनच्या चर्नोव्हस्की व आसपासच्या भागातील २७० च्यावर विद्यार्थ्याना युक्रेनला लागूनच असलेल्या रोमानिया या देशात हलवण्यात आले आहे. रोमानियाच्या सीमेवरवर रोमानियन नागरिकांनी भारतीय विद्यार्थ्यांना जेवणाची सुद्धा सोय केली आहे. अमरावती येथील साहिर तेलंग या विद्यार्थ्याने तेथील दृश्ये पाठवली आहेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला संरक्षण उपकरणे आणि लष्करी प्रशिक्षणासाठी ३५० दशलक्ष डॉलर्स मंजूर केले आहेत. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, अमेरिकेच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण असल्यास, २५० दशलक्ष डॉलर्सपर्यंतची मदत मंजूर करण्यासाठी परराष्ट्र सचिव देखील अधिकृत आहेत. युक्रेनला अमेरिकेकडून मिळणारी एकूण मदत ६०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत (अंदाजे ४ हजार ५०३ कोटींहून अधिक) आहे.
"युक्रेन आणि रोमानियामधील भारतीय दूतावास आम्हाला भारतात परत आणण्यासाठी युक्रेनमधून बाहेर काढत आहेत. आम्ही येथे आल्यापासून, रोमानियामधील भारतीय दूतावास सर्व गोष्टींची काळजी घेत आहे," असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
युक्रेनची राजधानी किव्हमध्ये रशियन सैन्याने हल्ले चढवले आहेत. किव्हमधील निवासी इमारतींना रशियन सैन्याकडून लक्ष करण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना किव्ह सोडण्यास सांगितले. पण त्यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. झेलेन्स्की यांनी आक्रमक पवित्रा घेत मित्रराष्ट्रांनी लढण्यासाठी शस्त्रात्रं पाठवल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.
रशिया-युक्रेन संघर्षात भारताने तटस्थ भूमिका स्वीकारली पाहिजे. पण रशियाला झुकते माप द्यायला पाहिजे.
शुक्रवारी घेतलेल्या सॅटेलाईट फोटोंमध्ये युक्रेनच्या सीमेपासून सुमारे ३२ किमी अंतरावर, दक्षिण बेलारूसमध्ये सुमारे १५० हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याचे, मॅक्सरने म्हटले आहे.
फोटो सौजन्य - AP
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान बुखारेस्ट येथे दाखल झाले. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
युक्रेनियन लष्कराने शनिवारी पहाटे सांगितले की युद्धग्रस्त देशात जोरदार लढाई दरम्यान त्यांनी १००० हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. त्याच वेळी, रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांच्या सैन्याने युक्रेनमधील २११ लष्करी संरचना नष्ट केल्या आहेत. तर, रशियन सैन्याने अद्याप मृतांची संख्या उघड केलेली नाही. दरम्यान, रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यात २५ नागरिक ठार आणि १०२ जखमी झाल्याचे संयुक्त राष्ट्रांनी सांगितले.
सध्या युक्रेनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून देशभरातून, विशेषत: जम्मू आणि काश्मीरमधून फोन येत आहेत. परराष्ट्र मंत्रालय सतत आवश्यक व्यवस्थेवर काम करत आहे. काळजी किंवा घाबरण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि सल्लागारांचे पालन करावे, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
रशियन सैन्य आता युक्रेनची राजधानी किव्ह येथे पोहोचले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना किव्ह सोडण्यास सांगितले. पण त्यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला. लढा येथे सुरु आहे. मला दारूगोळा हवा आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, झेलेन्स्की यांनी रशियाच्या विरोधात ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगत अमेरिकेची मदत नाकारली आहे.
बंकरमधील भारतीय विद्यार्थ्यांचे दृश्य त्रासदायक आहे. अनेक जण पूर्व युक्रेनमध्ये अडकले आहेत ज्यांच्यावर जोरदार हल्ला होत आहे. माझे विचार त्यांच्या चिंताग्रस्त कुटुंबियांसोबत आहेत. पुन्हा, मी भारत सरकारला तात्काळ परत आणण्याचे आवाहन करतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारत अस्वस्थ आहे. हिंसा आणि शत्रुत्व तात्काळ संपवण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करायला हवेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत काही तोडगा निघालेला नाही. भारत सर्व बाजूंच्या संपर्कात आहे आणि संबंधित पक्षांना वाटाघाटीसाठी परत येण्याचे आवाहन करत आहे. भारताने या प्रकरणावर आपली सातत्यपूर्ण, स्थिर आणि संतुलित भूमिका कायम ठेवली आहे.
युक्रेनवर हल्ला थांबवण्याचे आणि सर्व सैन्य मागे घेण्याचे आवाहन करणाऱ्या युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये ठराव मांडण्यात आला आहे. शुक्रवारी या ठरावाच्या बाजूने ११ तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विरोधात एक मत पडले. चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने मतदानापासून दूर राहिले.
रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला.
रशियाच्या या कृतीमुळे युरोपमध्ये व्यापक युद्धाची भीती निर्माण झाली आहे