Russia Ukraine War News Updates : रशियन सैन्य सतत पुढे सरकत असून, युक्रेनियन भूमीवर हल्ला करत आहे. रशियन सैन्य आता राजधानी किव्हपासून थोड्याच अंतरावर असल्याचे वृत्त आहे. युक्रेनियन सैनिक त्यांना कसे तरी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी वाटाघाटी करण्याच्या रशियाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची संपत्ती लवकरच जप्त केली जाऊ शकते. २७ देशांची युरोपियन युनियन या संदर्भात कराराच्या अगदी जवळ पोहोचली आहे. लक्झेंबर्गचे परराष्ट्र मंत्री जीन एसेलबोर्न यांनी शुक्रवारी हा दावा केला. तसेच युक्रेन सरकारने शुक्रवारी दावा केला की, रशियाने पिवडेनीच्या काळ्या समुद्रातील बंदराजवळ दोन विदेशी जहाजांवर गोळीबार केला.