Russia Ukraine War News Updates : रशियन सैन्य सतत पुढे सरकत असून, युक्रेनियन भूमीवर हल्ला करत आहे. रशियन सैन्य आता राजधानी किव्हपासून थोड्याच अंतरावर असल्याचे वृत्त आहे. युक्रेनियन सैनिक त्यांना कसे तरी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी वाटाघाटी करण्याच्या रशियाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची संपत्ती लवकरच जप्त केली जाऊ शकते. २७ देशांची युरोपियन युनियन या संदर्भात कराराच्या अगदी जवळ पोहोचली आहे. लक्झेंबर्गचे परराष्ट्र मंत्री जीन एसेलबोर्न यांनी शुक्रवारी हा दावा केला. तसेच युक्रेन सरकारने शुक्रवारी दावा केला की, रशियाने पिवडेनीच्या काळ्या समुद्रातील बंदराजवळ दोन विदेशी जहाजांवर गोळीबार केला.

Live Updates

Russia Ukraine War News :  शुक्रवारी रशियाने किव्हवर हल्ला केल्याचे वृत्त फेटाळले असून आणि रशियन सैन्य नागरी भागांना लक्ष्य करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 

10:12 (IST) 26 Feb 2022
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी एअर इंडियाचे विमान बुखारेस्टला रवाना

रशियन लष्करी हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी एअर इंडियाचे विमान शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावरून रोमानियाची राजधानी बुखारेस्टकडे रवाना झाले. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, AI१९४३ या विमानाने पहाटे ३.४० च्या सुमारास मुंबई विमानतळावरून उड्डाण केले आणि सकाळी १० च्या सुमारास (भारतीय प्रमाणवेळेनुसार) बुखारेस्ट विमानतळावर उतरणे अपेक्षित आहे.

10:06 (IST) 26 Feb 2022
बल्गेरियाकडून रशियन विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद

सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान, बल्गेरियाने रशियन विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे, असे सांगण्यात आले आहे.

09:42 (IST) 26 Feb 2022
अधिकाऱ्यांच्या सूचनेशिवाय सीमेवर जाऊ नका; भारतीय दूतावासाची सूचना

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने शनिवारी एक नियमावली जारी करून नागरिकांना सीमेवरील चौक्या आणि दूतावासातील भारतीय अधिकार्‍यांच्या सूचनेशिवाय कोणत्याही सीमेवरील चौक्यांवर न जाण्यास सांगितले.

09:37 (IST) 26 Feb 2022
युक्रेनच्या राजधानीवर हल्ला; किव्ह गोळीबार आणि स्फोटांनी हादरले

रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला.

(फोटो- AP)

रशियाच्या या कृतीमुळे युरोपमध्ये व्यापक युद्धाची भीती निर्माण झाली आहे