Ukraine Russia Live News Today, 9 March: युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियाला अमेरिकेने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने मंगळवारी रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामागील सर्वात मोठे कारण रशियाच्या अर्थव्यवस्थेवर निर्बंध लादण्याचे आहे. कारण रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे.

युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यानंतर रशियाची आर्थिकदृष्ट्या कोंडी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी वेगवेगळे निर्बंध जाहीर केले असून त्यातील एक म्हणजे खनिज तेलाच्या आयातीवरील बंदी आहे.

Live Updates

Russia Ukraine War Live: रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अमेरिकेने मंगळवारी रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला.

16:31 (IST) 9 Mar 2022
आण्विक चिथावणीचे प्रयत्न रोखण्यासाठी अणुऊर्जा प्रकल्पांवर नियंत्रण, रशियाची माहिती

युक्रेनमधील आक्रमणादरम्यान, रशियाने चर्नोबिल आणि झापोरोझे अणुऊर्जा प्रकल्पांवर नियंत्रण मिळवले. हे आण्विक चिथावणीचे प्रयत्न रोखण्यासाठी केले गेले होते, असं रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.

https://platform.twitter.com/widgets.js

16:12 (IST) 9 Mar 2022
कॅनडाच्या पंतप्रधानांनी युक्रेनच्या अध्यक्षांशी केली बातचीत

"मी झेलेन्स्कीशी नुकतेच बोललो. कॅनडा युक्रेनला मदत म्हणून उच्च-विशिष्ट लष्करी उपकरणांची दुसरी शिपमेंट पाठवेल. रशियावरील निर्बंध आणि युक्रेनसाठी मानवतावादी मदत यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली असून झेलेन्स्की यांना कॅनडाच्या संसदेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले," अशी माहिती कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

16:09 (IST) 9 Mar 2022
युक्रेनसोबतच्या चर्चेत प्रगती, रशियाची माहिती

युक्रेनबरोबरच्या चर्चेत थोडी प्रगती होत असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. तसेच रशिया युक्रेन सरकारला उलथून टाकण्याचा प्रयत्न करत नसल्याचे वृत्त एएफपी न्यूज एजन्सीने दिले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

15:10 (IST) 9 Mar 2022
रशिया, बेलारूसवरील निर्बंध कठोर करण्यास युरोपियन युनियनची सहमती

युक्रेनवर आक्रमण केल्याप्रकरणी रशिया आणि बेलारूस यांच्यावरील निर्बंध आणखी कठोर करण्यास युरोपीय युनियनने सहमती दर्शवली आहे.

14:21 (IST) 9 Mar 2022
चेरनोबिल न्यूक्लियर डेटा सिस्टमशी संपर्क तुटला; संयुक्त राष्ट्राची माहिती

चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पाकडून यूएनच्या टीमला डेटा मिळत नाहीये, अशी माहिती टीमने दिली आहे. युक्रेनच्या या प्रकल्पात रशियन देखरेखीखाली काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी युएनने चिंता व्यक्त केली आहे. २४ फेब्रुवारी रोजी, रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आणि प्लांट ताब्यात घेतला होता.

13:51 (IST) 9 Mar 2022
सेवेरोडोनेस्तक शहरात रशियन सैन्याच्या हल्ल्यात १० लोक ठार

पूर्व युक्रेनमधील सेवेरोडोनेस्तक शहरात रशियन सैन्याच्या हल्ल्यात किमान १० लोक ठार झाले, असे वृत्त एएफपीने स्थानिक अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

13:45 (IST) 9 Mar 2022
युद्धात आतापर्यंत रशियाचे १२ हजार सैनिक मारले गेले, युक्रेनचा दावा

आतापर्यंतच्या युद्धात १२ हजारहून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे.

13:16 (IST) 9 Mar 2022
सुमीमध्ये रात्रभर झालेल्या हवाई हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू

सुमी प्रादेशिक राज्य प्रशासनाचे प्रमुख दिमित्रो झिव्हित्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीमध्ये रात्रभर झालेल्या रशियन हवाई हल्ल्यात २२ लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी तीन लहान मुलं होती.

12:45 (IST) 9 Mar 2022
...तेव्हा हा गाजावाजा अन् तमाशा नव्हता, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका

युक्रेनमधून मुलांना बाहेर काढणे हे स्वयंघोषित 'न्यू इंडिया'ची शक्ती दर्शवते. भारत सरकारने २०१४पूर्वी कोणताही गाजावाजा न करता २०११मध्ये १५ हजारहून अधिक भारतीयांना लिबियातून, २००६ मध्ये २३०० जणांना लेबनॉनमधून आणि १९९० मध्ये आखाती देशांमधून जवळपास १ लाख ७० हजार भारतीयांना बाहेर काढले होते. त्यावेळी मंत्र्यांच्या पातळीवरचा कोणताही तमाशा, नाटक नव्हते, अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
12:31 (IST) 9 Mar 2022
जो बायडेन यांचा युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना सूचक इशारा

अमेरिकेने रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. जगभरातील अनेक देशांनी निर्बंध लादल्यामुळे रशिया लगेच युद्ध थांबवण्याची चिन्हे कमी आहेत. अशातच युक्रेनमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन कधीही विजयी होणार नाही, असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केलंय. सविस्तर वृत्त येथे वाचा -

जो बायडेन यांचा युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना सूचक इशारा; म्हणाले, “पुतिन कधीच…”

12:22 (IST) 9 Mar 2022
रशियाला दहशतवादी देश म्हणून घोषित करा, युक्रेनच्या अध्यक्षांचे आवाहन

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या राष्ट्राविरुद्ध विशेष लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ब्रिटीश खासदारांना रशियाला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले. तसेच युक्रेनची हवाई हद्द सुरक्षित ठेवण्याची खात्री करण्यासाठी मॉस्कोवर कठोर निर्बंध घालण्याचे आवाहन केले. झेलेन्स्की यांनी मंगळवारी ब्रिटनच्या संसदेला संबोधित केले.

12:00 (IST) 9 Mar 2022
रशिया आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री बुधवारी तुर्कीमध्ये भेटणार

रशियन परराष्ट्र मंत्री लॅव्हरोव बुधवारी युक्रेनियन परराष्ट्र मंत्र्यांना भेटण्यासाठी तुर्कीला जाणार आहेत, असं वृत्त रॉयटर्सने दिलंय.

11:55 (IST) 9 Mar 2022
किव्हमध्ये एअर अलर्ट जाहीर

बुधवारी सकाळी किव्ह आणि आसपासच्या परिसरात एअर अलर्ट घोषित करण्यात आला. रहिवाशांना शक्य तितक्या लवकर बंकरमध्ये आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले.

11:18 (IST) 9 Mar 2022
भारताचे युक्रेनमधील ऑपरेशन गंगा संपले

भारतीय विद्यार्थ्यांच्या शेवटच्या मोठ्या गटाने मंगळवारी युक्रेन सोडलं. ऑपरेशन गंगा अतर्गत त्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलंय. आता व्यावसायिक उड्डाणांचं निलंबन, कार्ड कंपन्यांचा बहिष्कार आणि निर्बंधांमुळे बेलारूसमध्ये शिकणाऱ्या भारतीयांमध्ये चिंता वाढत आहे.

10:50 (IST) 9 Mar 2022
अमेरिकेने रशियावर निर्बंध लादल्यानंतर तेलाच्या किमती वाढल्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर तेलाच्या किमती प्रति बॅरल १२७ डॉलरवर पोहोचल्या आहेत.

10:16 (IST) 9 Mar 2022
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनमधून आपल्या ९ नागरिकांची सुटका केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. या कारवाईत नेपाळी, ट्युनिशियाच्या विद्यार्थ्यांचीही सुटका करण्यात आली, अशी माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

10:03 (IST) 9 Mar 2022
युक्रेनमध्ये आतापर्यंत किती जणांचा मृत्यू?

युक्रेन आणि संयुक्त राष्ट्रांनी असा अंदाज लावला आहे की, या लढाईत हजारो रशियन सैन्य आणि नागरिक मारले गेले आणि बरेच जण जखमी झाले. युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार कार्यालयाने सांगितले की त्यांनी युक्रेनमध्ये आतापर्यंत १३३५ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. परंतु खरा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे.

09:08 (IST) 9 Mar 2022
पाकिस्तानी तरुणीनं मानले पंतप्रधान मोदींचे आभार

पाकिस्तानच्या अस्मा शफीकने तिला युक्रेनमधून बाहेर काढल्याबद्दल किव्हमधील भारतीय दूतावास आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. भारतीय अधिकार्‍यांनी तिची सुटका केली आहे आणि देशाबाहेर काढले. लवकरच ती तिच्या कुटुंबाला भेटणार आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

08:58 (IST) 9 Mar 2022
पेप्सिकोने रशियात प्रॉडक्ट्सच्या उत्पादन आणि विक्रीवर घातली बंदी

पेप्सिकोने रशियामधील पेप्सी-कोला आणि इतर जागतिक पेयांचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

08:51 (IST) 9 Mar 2022
कोका-कोला कंपनीने रशियामधील आपला व्यवसाय गुंडाळला

कोका-कोला कंपनीने रशियामधील आपला व्यवसाय बंद केला आहे. "युक्रेनमध्ये भीषण युद्धाचे परिणाम भोगणाऱ्या लोकांसोबत आम्ही आहोत," असं कंपनीने म्हटलंय.

https://platform.twitter.com/widgets.js

किव्हमधील रस्त्यावर एक युक्रेनियन सैनिक जळत्या लष्करी ट्रकच्या ढिगाऱ्यावरून चालताना.. (AP/फाइल)

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी बंद करणार असल्याची घोषणा ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज शेलने मंगळवारी केली. शेलने एका निवेदनात म्हटले आहे की ते रशियाकडून टप्प्याटप्प्याने सर्व हायड्रोकार्बन्स- कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने, नैसर्गिक वायू आणि द्रवीभूत नैसर्गिक वायू खरेदी करणे थांबवणार आहेत.

Story img Loader