रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असताना एक नवी माहिती समोर आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे खाजगी सैन्य म्हणून ओळख असलेल्या ‘वॅगनर’ गटाने युक्रेन युद्धासाठी सैन्यात ‘एचआयव्ही’ आणि ‘हिपॅटायटिस सी’ आजारांनी ग्रस्त कैद्यांची भरती केली आहे, असा दावा ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेनं केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Russia -Ukraine war : युक्रेनमध्ये अणवस्त्रे वापरण्याचा मॉस्कोचा विचार नाही – पुतिन यांचं विधान!

”वॅगनर’ गटानं याआधीच्या संघर्षात सैन्य भरतीसाठी उच्च मानकं राखली होती. या गटातील अनेकांनी व्यावसायिकरित्या सैन्यात सेवा दिली होती. मात्र, आता या सैन्यात आजाराने ग्रस्त कैद्यांची भरती करण्यात येत आहे”, असे या गुप्तचर संस्थेनं म्हटलं आहे. १०० हून अधिक कैद्यांना त्यांच्या आजाराबाबत चिन्हांकित करणारे रंगीत ब्रॅसलेट देत तैनात करण्यात आले आहे. रशियाच्या या पावलामुळे युक्रेनमधील सैनिकांमध्ये संताप असल्याचे ब्रिटनकडून सांगण्यात आले आहे. युक्रेनने सेवास्तोपोलमधील समुद्री ताफ्यावर १६ ड्रोन्सनी हल्ला केल्याचा दावा रशियाने केला आहे. या हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्याची मागणी रशियाने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत केली आहे, असे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्त संस्थेनं दिलं आहे.

Gujarat Bridge Collapsed: “काही तरुण मुद्दाम पूल हलवत होते, मग आम्ही…”, दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबियांनी सांगितली आपबीती

दरम्यान, युक्रेनवर अणवस्रांचा वापर करण्याचा कोणताही विचार नसल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट केले आहे. पुतिन यांनी एकतर्फी विलीनीकरण केलेल्या युक्रेनच्या चार प्रांतांमध्ये लष्करी आणीबाणी जाहीर केली आहे. रशियाने जिंकलेले प्रांत परत मिळवण्यासाठी युक्रेनच्या फौजांची घोडदौड सुरू असताना पुतिन यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लुहान्स्क, डोनेत्स्क, झापोरीझ्झिया आणि खेरसन या प्रांतांच्या रशियाधार्जिण्या प्रमुखांना अधिक अधिकार बहाल करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia ukraine war russia president vladimir putins private army the wagner group recruiting convicts suffering with hiv and hepatitis rvs