युक्रेनमधल्या भारतीयांना युक्रेनच्या सुरक्षा दलांनी ओलिस ठेवलं असून, त्यांचा ढालीसारखा वापर करत असल्याचं ट्वीट भारतातल्या रशियन दूतावासानं केलं होतं. त्यामुळे भारतीयांच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली होती. मात्र ही केवळ अफवाच असल्याचं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
भारतामधील रशियन दूतावासाने ट्वीट केलं होतं की, “ताज्या माहितीनुसार भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनियन सुरक्षा दलाच्या जवानांनी ओलीस ठेवलं आहे. ते त्यांचा वापर ढालीप्रमाणे करत आहेत आणि त्यांना शक्य त्या सर्व पद्धतीने युक्रेन सोडून रशियाला जाण्यामध्ये अडथळे निर्माण करतायत. या प्रकरणामध्ये मुलांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी किव्हवर आहे.”
मात्र, ह्याबद्दल कोणतीही माहिती आपल्या हाती लागली नसल्याचं भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आपल्या निवेदनात मंत्रालयाने म्हटलं आहे की, युक्रेनमधला भारतीय दूतावास युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांच्या सातत्याने संपर्कात आहे. युक्रेनच्या प्रशासनाच्या सहकार्याने काल अनेक भारतीयांनी खारकीव्ह सोडलं आहे. आम्हाला कोणत्याही विद्यार्थ्याला, नागरिकांना ओलिस ठेवल्यासंदर्भातली कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. खारकीव्ह आणि आजूबाजूच्या परिसरातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष रेल्वेची सोय व्हावी यासाठी आम्ही युक्रेन प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटलं आहे की, आम्ही रशिया, रोमानिया, पोलंड, हंगेरी, स्लोवाकिया आणि मोलडोवा अशा देशांसोबत समन्वय साधून काम करत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीयांना युक्रेनमधून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. या साठी युक्रेनच्या प्रशासनाने केलेल्या सहकार्याचे आम्ही आभार मानतो.
युद्धविषयक ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया ‘मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग’ तयार करत असल्याचा निर्वाळा रशियन राजदूतांकडून देण्यात आला आहे. युक्रेन-रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे चार हजार भारतीय अडकून पडले असून, त्यात बहुतांश वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताने रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर रशियातर्फे हा निर्वाळा देण्यात आला आहे. याचसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये चर्चा झाल्याचंही भारतातील रशियन दूतावासाने स्पष्ट केलंय.