रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्ह येथे पोहोचले आहे. अशा परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या ट्विटर पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी किव्ह येथून दोन व्हिडिओ जारी करत रशियन आक्रमणाविरूद्ध राजधानीचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे. रशियन सैन्य किव्ह येथे असल्याने परिस्थितीत अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना किव्ह सोडण्यास सांगितले. पण त्यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. लढा येथे सुरु आहे. आम्हाला शस्त्रे आणि दारूगोळा हवा आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, झेलेन्स्की यांनी रशियाच्या विरोधात ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगत अमेरिकेची मदत नाकारली आहे.

झेलेन्स्की मध्य किव्हमध्ये आपल्या प्रमुख सहाय्यकांसोबत आहेत. वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश देत आपण किव्हमध्येच असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये झेलेन्स्की, तुम्हा सर्वांना शुभ संध्याकाळ. सरकारचे प्रमुख नेते येथे आहेत. राष्ट्रपती कार्यालयाचे प्रमुख येथे आहेत. पंतप्रधान श्मीहल येथे आहेत. सल्लागार पोडोलियाक येथे आहेत. आम्ही सर्व येथे आहोत. आमचे सैनिक येथे आहेत. आमचे नागरिक येथे आहेत. आपण सगळे इथे आपल्या स्वातंत्र्याचे, आपल्या देशाचे रक्षण करत आहोत आणि ते तसेच करत राहू. आमचे रक्षण करणार्‍या पुरुष आणि स्त्रियांचा आम्हाला अभिमान आहे, ” असे म्हटले आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…

त्यानंतर झेलेन्स्की यांनी शनिवारी पुन्हा अफवांवर विश्वास ठेऊ नका असे म्हणत आणखी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. आम्ही शस्त्रे खाली ठेवणार नाही, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. एएफपीच्या वृत्तानुसार या व्हिडिओमध्ये त्यांनी फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका असे म्हटले आहे. “आम्ही आमची शस्त्रे खाली ठेवणार नाही. आमची शस्त्रे हीच आमची ताकद आहे. आम्ही येथे आहोत आणि आम्ही आमच्या देशाचे रक्षण करू. ही आपली मातृभूमी आहे. आपला देश, आपली मुले. आम्ही सर्वांचे संरक्षण करू,” असा संदेश झेलेन्स्की यांनी आपल्या देशवासियांना दिला आहे.

झेलेन्स्की यांनी हा व्हिडिओ युक्रेनच्या राष्ट्रपती भवनाजवळ शूट केला आहे. झेलेन्स्की यांच्या या व्हिडिओचे जगभरातील लोकांनी कौतुक केले आहे. लोकांनी त्यांना हिरो म्हटले आहे.

दरम्यान, झेलेन्स्की यांनी रशियाच्या विरोधात ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगत अमेरिकेची मदत नाकारली आहे. झेलेन्स्कीने म्हटले आहे की लढा येथे आहे आणि मला राईड नव्हे तर अँटी-टँक दारूगोळा हवा आहे. गेल्या तीन दिवसांपासून रशियन सैन्य युक्रेनवर चारही बाजूंनी हल्ले करत आहे. मात्र, युक्रेनच्या किती भागावर युक्रेनचे लष्कर आणि रशियन लष्कराचे नियंत्रण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, रशियन सैन्य राजधानी किव्हच्या हद्दीत पोहोचल्याचे अनेक वृत्तांतून स्पष्ट झाले आहे.