अमेरिकेने एफ-२२ लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बॉम्ब टाकावेत असा सल्ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. रिपब्लिकन राष्ट्रीय समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यानंतर चीनने हे केलं सांगून आपण फक्त मागे बसून त्यांच्यातील भांडण पाहत राहायचं असंही यावेळी ट्रम्प म्हणाले. युएस मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर प्रेक्षक हसत टाळ्या वाजवत होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेनस्की यांच्यासोबत शनिवारी झालेल्या झुम बैठकीतल्या फोटोंचे स्क्रीनशॉट तसंच बेजबाबदार वक्तव्यांमुळे आधीच रिपब्लिकनवर टीका होत असताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे.
Russia Ukraine War Live: पंतप्रधान मोदी आज पुतिन यांच्याशी फोनवर बोलणार
ट्रम्प यांनी यावेळी नाटोचा पेपरवरील वाघ असा उल्लेख करत म्हटलं की,, “नेमक्या कोणत्या मुद्द्यावरुन देश आम्ही मानवतेविरुद्धचा हा मोठा गुन्हा स्वीकारू शकत नाही? आम्ही ते होऊ देऊ शकत नाही. आम्ही ते होऊ देऊ शकत नाही असं म्हणत आहेत”.
“जर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींची हत्या झाली तर…,” अमेरिकेने सांगितला प्लान
“बायडन यांनी असं वक्तव्य करणं थांबवावं आणि हे प्रत्येकाने ऐकावं. रशिया एक अणुशक्ती असणारा देश असल्याने आपण त्यांच्यावर हल्ला करणार नाही..बरोबर ना?,” असं ट्रम्प म्हणाल्याचं वृत्त सीबीएस न्यूजने दिलं आहे. “हे कोण म्हणतंय तुम्हाला माहिती आहे? मग हे तथ्य असो किंवा आभास असो. आपण रशियावर हल्ला करणार नाही. तो अणुशक्ती असणारा देश आहे” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर ट्रम्प यांनी पुतीन यांची प्रशंसा केली होती. मात्र यामुळे रिपब्लिकनने नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलली असून आता बायडन यांच्यावर हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे.
याआधी बोलताना ट्रम्प यांनी २१ व्या शतकात आपण एकमेव राष्ट्राध्यक्ष राहिलो आहोत जेव्हा रशियाने कोणत्याही देशावर आक्रमण केलं नाही असं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “बुश असताना जॉर्जिया, ओबामा असताना क्रीमिया आणि बायडन असताना रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केलं,” असं ते म्हणाले होते.