रशियाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या तरच युक्रेनवरील लष्करी कारवाई थांबवण्यात येईल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रविवारी सांगितले. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केले. तेव्हापासून आतापर्यंत ११ हजारहून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा, युक्रेनच्या संरक्षण दलाने केला. मात्र, युद्धात युक्रेनची किती लष्करी हानी झाली, याबद्दल माहिती देण्यात आली नाही. दरम्यान या हल्ल्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची हत्या झाली तर पुढील योजना काय असेल याबद्दल अमेरिकेने खुलासा केला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकने यांनी रशियाने केलेल्या हल्ल्यात जर राष्ट्राध्यक्ष मारले गेले तर पुढील योजना काय असेल याची आखणी युक्रेनकडून करण्यात आल्याचं सांगितलं आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वारंवार रशियाने आपल्याला ठार मारण्याचा आदेश दिल्याचा दावा करत आहेत. युक्रेनच्या दाव्यानुसार, झेलेन्स्की यांना ठार करण्यासाठी रशियामधील अनेकजण कीव्ह शहरात उपस्थित आहेत. त्यांना झेलेन्स्की यांची हत्या करण्याचा आदेश असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
Russia Ukraine War Live: पंतप्रधान मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी बोलणार
महत्वाचं म्हणजे पाश्चिमात्य सुरक्षा सूत्रांनीदेखील मॉस्कोच्या हेरांशी संबंध असलेल्या रशियन काही सैनिकांनी आक्रमणापूर्वीच युक्रेनमध्ये त्यांची उपस्थिती वाढवली असल्याचं सांगितलं होतं.
झेलेन्स्की यांची हत्या होण्याची भीती व्यक्त करणाऱ्या अँटोनी ब्लिंकने यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, “युक्रेन सरकारचं नेतृत्व उल्लेखनीय आहे. मी युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोललो असून त्यांनी सरकार अस्थिर होऊ नये यासाठी आमच्या देशाकडे योजना तयार असल्याचं सांगितलं आहे”.
Ukraine War: विमानतळावर बॉम्ब हल्ले करणाऱ्या रशियाचं विमान युक्रेनने पाडलं; वैमानिकाचा जागीच मृत्यू
गेल्या आठवड्यात युक्रेनच्या अध्यक्षांना ठार मारण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांना वेळीच माहिती मिळाली आणि हा कट उधळून लावला. युक्रेनच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रशियामधील प्रमुख सुरक्षा यंत्रणा एफबीएसने या हल्ल्याची माहिती दिली होती.