युक्रेनच्या मेल्टिपूल शहराच्या महापौरांचं अपहरण करण्यात आलं असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. युक्रेनच्या संसदेने याबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की मेल्टिपूलचे महापौर इव्हान फेडरोव्ह यांचं अपहरण १० जणांच्या एका गटाने केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इव्हान फेडरोव्ह यांनी शत्रूला सहकार्य करण्यास नकार दिल्याने त्यांच्याकडून ही कृती करण्यात आल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. महापौर फेडरोव्ह हे शहरातल्या मूलभूत संसाधनांच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

शुक्रवारी रात्री झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ शेअर करत फेडरोव्ह यांच्या अपहरणाच्या बातमीची पुष्टी केली आहे. या व्हिडीओत झेलेन्स्की म्हणतात, हे निश्चितच शत्रूच्या दुर्बलतेचं लक्षण आहे. त्यांनी आता दहशत पसरवण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. त्यांनी आता युक्रेनच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे मेल्टिपूलच्या महापौरांचं अपहरण हा केवळ एका समुदायासंदर्भातला, किंवा युक्रेनसंदर्भातला गुन्हा नाही. तर हा लोकशाहीविरोधातला गुन्हा आहे. रशियाची ही कृती इस्लामिक देशांमधल्या अतिरेक्यांसारखी आहे.