रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबत लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर रशियन सैन्य युक्रेनमध्ये कधीही घुसू शकते. त्याच वेळी, पुतिन यांनी युक्रेनमधील रशियन कारवायांमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. पुतीन यांनी युक्रेनच्या लष्कराला ‘शस्त्रे खाली’ ठेवण्याचे आवाहनही केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना त्यांच्या सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनमध्ये आपल्या सैन्याला प्रवेश करण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे.

रशिया-युक्रेन संघर्षातील जर्मन दुवा – काय आहे नॉर्ड स्ट्रीम-२ पाइपलाइन?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली आणि नागरिकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आपण हे करत आहोत असे त्यांनी म्हटले. एका टीव्ही चॅनेवर बोलताना पुतिन म्हणाले की, युक्रेनकडून येणाऱ्या धमक्यांना प्रतिसाद म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. युक्रेनवर ताबा मिळवण्याचे रशियाचे ध्येय नाही. रक्तपाताची जबाबदारी युक्रेनियन शासनाची आहे.

पुतीन यांचा इशारा

पुतिन यांनी अमेरिकेसह युरोपीय देशांना इशारा देत, रशियाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणीही प्रयत्न केला तर त्यांनी कधीही पाहिलेले नाही असे परिणाम घडतील असे म्हटले आहे. युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्यापासून रोखण्यासाठी आणि मॉस्को सुरक्षा हमी देण्याच्या रशियाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर केला.

एपीच्या वृत्तानुसार, रशियाच्या लष्करी कारवाईचे उद्दिष्ट युक्रेनचे निशस्त्रीकरण करणे आहे. शस्त्रे ठेवणारे सर्व युक्रेनियन सैनिक सुरक्षितपणे लढाईच्या क्षेत्रातून बाहेर पडण्यास सक्षम असतील, असे पुतीन यांनी म्हटले.

रशिया-युक्रेनचं युद्ध झाल्यास तुमच्या खिशाला बसणार फटका; भारतात ‘या’ गोष्टी महागणार

फुटीरतावाद्यांच्या ताब्यातील पूर्वेकडील युक्रेनच्या डोनेस्तक शहरात गुरुवारी पहाटे किमान पाच स्फोट झाले. यानंतर लष्कराचे चार ट्रक घटनास्थळी रवाना झाले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेचे रशियावर नवे व्यापार निर्बंध

पूर्व युक्रेनच्या काही भागांत सैन्य पाठवण्याचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा निर्णय म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघडउघड उल्लंघन’ असल्याचे सांगून, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियावर व्यापार निर्बंध लागू केले. पाश्चिमात्य देशांशी व्यापार करण्याच्या रशियाच्या क्षमतेला यातून लक्ष्य करण्यात आले आहे.

युक्रेनवर केलेल्या कारवाईबद्दल रशियाविरुद्ध अमेरिकेच्या वतीने निर्बंधांचा ‘पहिला भाग’ बायडेन यांनी जाहीर केला. दोन मोठय़ा वित्तीय संस्था, रशियाचे सार्वभौम कर्ज आणि रशियाचे उच्चपदस्थ नेते व त्यांचे कुटुंबीय यांच्याविरुद्ध जाहीर केलेल्या या निर्बंधांमुळे ‘रशियन सरकारचा पाश्चिमात्य वित्तपुरवठय़ाशी संबंध तुटेल’, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia vladimir putin threatening warning to europe including the united states abn