रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज युद्धाची घोषणा केली. या युद्धामुळे आता जगभरामध्ये रशिया आणि युक्रेनच्या लष्करी सामर्थ्यची (Russia Vs Ukraine War Defence Power) चर्चा सुरु झालीय. रशियाने एकाच वेळी युक्रेनमधील २५ ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केलीय.

ब्रुसेल्सबरोबरच उत्तरेकडील सीमांवरुनही रशियन लष्कराने युक्रेनमध्ये शिरण्यास सुरुवात केलीय. दरम्यान दुसरीकडे रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेननेही रशियाला जशाच तसं उत्तर दिल्याचा दावा केलाय. रशियाची सहा विमानं आणि एक हेलिकॉप्टर आम्ही पाडल्याचा दावा युक्रेननं केलाय. युक्रेनमधील लुहान्स प्रांतामध्ये आम्ही ही विमानं पाडल्याचा दावा युक्रेननं केलाय. लुहान्स्क हा युक्रेनमधील बंडखोर प्रांतांपैकी एक आहे. याच आठवड्यामध्येच रशियाने लुहान्स्कला वेगळा देश म्हणून घोषित केलं आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

नक्की पाहा >> Video: रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियात दाखल झालेले पाकिस्तानी PM विमानातून उतरल्या उतरल्या म्हणाले…

दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात असले तरी या संघर्षामध्ये नक्की कोणत्या देशाकडे किती युद्धा समुग्री आहे आणि कोणत्या देशाची ताकद किती आहे याबद्दलची आता चर्चा सुरु झालीय. त्याच पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेनकडे नेमकं किती लष्करी सामर्थ्य आहे यावर टाकलेली नजर.

किती सैनिक?
ग्लोबल फायरपॉवर वेबसाईटवरील वृत्तानुसार जगातील सर्वाधिक शक्तीशाली लष्कर असणाऱ्या देशांच्या यादीत रशिया दुसऱ्या स्थानी आहे तर युक्रेन २२ व्या. रशियाकडे ८ लाख ५० हजार जवानांची फौज आहे. त्याचप्रमाणे बंडखोर प्रांतामधील डॉनेत्स्क, लुहान्स्क प्रांतातील ३४ हजार बंडखोर रशियाच्या बाजूने आहेत.

नक्की पाहा हे फोटो >> मेट्रो स्थानकांत आश्रय, ATM समोरील रांगा, गाड्यांची गर्दी, रस्त्यावर तोफा अन्…; युक्रेन युद्धाची दाहकता दाखवणारे फोटो

दुसरीकडे युक्रेनकडे दोन ते दीड लाखच सक्रीय सैनिक आहेत. मात्र दोन्ही देशांकडे राखीव सैन्याची संख्या अडीच लाख इतकी आहे. पॅरामिलेट्री फोर्सबद्दल बोलायचं झाल्यास युक्रेन रशियाच्या आसपासही नाहीय. रशियाकडे अडीच लाखांची पॅरामिलट्री फोर्स आहे तर युक्रेनकडे ही संख्या अवघी ५० हजार इतकी आहे.

नक्की वाचा >> Russia-Ukraine Crisis : पुतिन यांना इंग्रजी येतं का?; त्यांना किती आणि कोणत्या भाषा येतात?

एअरफोर्स
रशियन एअरफोर्स हे आकाराच्या दृष्टीने जगातील दुसरं सर्वात मोठं एअरफोर्स आहे. या यादीत युक्रेन ३१ व्या स्थानी आहे. रशियाकडे एकूण ४ हजार १७३ विमानं आहेत. तर युक्रेनकडे केवळ ३१८ विमानं आहेत. रशियाकडे एकूण ७७२ फायटर जेट्स आहेत. तर युक्रेनकडे ६९ फायटर जेट्स आहेत.

जमीनीवरील लष्करी सामर्थ्य किती?
जमीनीवरील लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत रशियाहून शक्तीशाली देश जगात नाही. रशियाकडे एकूण १२ हजार ४२० रणगाडे आहेत. युक्रेनकडे २ हजार ५९६ रणगाडे आहेत. युक्रेन लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत जगात १३ व्या स्थानी आहे.

नौदल
या संघर्षामध्ये नौदलाचा अधिक वापर होण्याची शक्यता फारच कमी आहे. तरी युक्रेनकडील ३८ युद्धनौका या रशियाच्या ६०० जाहजांसमोर काहीच नाहीत असं म्हणता येईल. समुद्रात हल्ला करण्यासाठी रशियाकडे ७० पाणबुड्या आहेत तर युक्रेनकडे एकही नाही.

नक्की वाचा >> Ukraine-Russia War: युक्रेनकडून प्रतिकार; रशियाची सहा विमानं आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा

युरोपियन देशांकडून हवीय युक्रेनला मदत…
युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेजनिकोव यांनी पाश्चिमात्य देशांना मदत करण्याचं आवाहन करत आहेत. ट्विटरवरुन ते यासंदर्भात भाष्य करताना स्टिंगर मिसाइल, दारुगोळा, रायफल्स, ऑप्टीकल व्हिजनवाल्या मशीनगन यासारख्या शस्त्रांची मदत करण्याची मागणी करत आहेत. अमेरिकेने यापूर्वीच युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्र पाठवली आहेत. यामध्ये जॅव्हलीन मिलाइल्सचाही समावेश आहे.