रशियाने युक्रेनविरुद्धात युद्ध पुकारल्यानंतर जगभरातील देश रशियासमर्थक आणि विरोधक अशा दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. अनेक युरोपीयन देशांबरोबरच अमेरिकेनेही या हल्ल्याचा निषेध करत रशियावर आर्थिक निर्बंध लादलेत तर दुसरीकडे चीनसारख्या देशांनी रशियाचे पाठराणख केलीय. दरम्यान यासारख्या संघर्षामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन चर्चेने प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे कालपासून रशिया दौऱ्यावर आहेत. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच आंतरराष्ट्रीय विषयांमधील जाणकार असलेल्या एका रशियन तज्ज्ञाने रशिया-युक्रेन संघर्षाची तुलना भारत-पाकिस्तान संबंधांशी केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॉस्कोमधील रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेसमधील इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड इकनॉमी अ‍ॅण्ड इंटरनॅशनल रिलेशन्समधील वरिष्ठ सहसंशोधक अलेक्सी कुप्रियानोव्ह यांनी द इंडियन एक्सप्रेसच्या निरुपमा सुब्रमण्यम यांना दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलं आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं भाषण पाहिल्यास त्यांना पुन्हा एकदा युक्रेन रशियामध्ये समावून घ्यायचाय असं दिसतंय. ते खरोखर असं करण्याचा प्रयत्न करतायत का?, असा प्रश्न अलेक्सी कुप्रियानोव्ह यांना विचारण्यात आला असता त्यांनी नाही असं उत्तर दिलं.

नक्की पाहा हे फोटो >> मेट्रो स्थानकांत आश्रय, ATM समोरील रांगा, गाड्यांची गर्दी, रस्त्यावर तोफा अन्…; युक्रेन युद्धाची दाहकता दाखवणारे फोटो

अलेक्सी कुप्रियानोव्ह

युक्रेनवर ताबा मिळवण्याचा पुतिन यांचा विचार नसल्याचं सांगताना अलेक्सी कुप्रियानोव्ह यांनी या सर्व रशिया युक्रेन संघर्षाची तुलना भारत-पाकिस्तान संघर्षासोबत केली. “नाही ते (पुतिन) युक्रेनचा रशियात समावेश करण्यासंदर्भात बोललेले नाहीत. त्यांनी रशियाचा मोठा भाग स्टॅलिन यांच्यासहीत समाजवादी कारकिर्दीमध्ये युक्रेनला कशाप्रकारे देण्यात आला याबद्दल भाष्य केलं,” असं अलेक्सी कुप्रियानोव्ह यांनी सांगितलं.

नक्की पाहा >> Video: रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियात दाखल झालेले पाकिस्तानी PM विमानातून उतरल्या उतरल्या म्हणाले…

पुढे बोलताना, “पुतिन यांनी युक्रेनचं विघटन (तुकडे) होत असल्याचं अधोरेखित करत युक्रेनची धोरणं ही तर्कशून्य असल्याचं म्हटलं. पुतिन यांनी युक्रेनला विघटन कसं होतं हे दाखवून देऊ शकतो असं म्हणताना युक्रेनच्या ताब्यातील सर्व प्रदेश हातचे जातील असं सांगितलंय,” असं उत्तर अलेक्सी कुप्रियानोव्ह यांनी दिलंय.

पुढे बोलताना अलेक्सी कुप्रियानोव्ह यांनी युक्रेनचा रशियात समावेश करुन घेण्याचा पुतिन यांचा विचार आहे असं आपल्याला वाटत नसल्याचं स्पष्ट केलंय. “पण मला वाटत नाही की त्यांना युक्रेनचा रशियात समावेश करायचा असेल. खरं तर आम्हाला या प्रश्नावर राजकीय उत्तर शोधायचंय. युक्रेन प्रश्नावर वाटाघाटी करुन समाधान मिळू शकतं त्याचा रशियात समावेश करुन नाही,” असं अलेक्सी कुप्रियानोव्ह म्हणालेत.

नक्की वाचा >> Ukraine-Russia War: युक्रेनकडून प्रतिकार; रशियाची सहा विमानं आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा

पुढे बोलताना अलेक्सी कुप्रियानोव्ह यांनी रशिया-युक्रेन संघर्षाचा संबंध भारत-पाकिस्तान संघर्षाशी जोडला. “मला या तुलनेसाठी माफ करा पण ज्याप्रमाणे भारतासाठी पाकिस्तान आहे त्याचप्रमाणे आमच्यासाठी युक्रेन आहे. त्यामुळेच आम्ही आमचा शांततापूर्ण पाकिस्तान (युक्रेन) मिळवणार आहोत. आम्ही आमच्या सीमेवरील भारतसमर्थक पाकिस्तान मिळवणार आहोत,” असं अलेक्सी कुप्रियानोव्ह म्हणालेत. अलेक्सी कुप्रियानोव्ह यांची ही संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia vs ukraine war for us ukraine is the same as pakistan for india says alexey kupriyanov imemo senior research fellow scsg
Show comments