मागील तीन महिन्यांहून अधिक काळापासून युक्रेनच्या सीमांवर लष्कर जामा करणाऱ्या रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला चढवला. तिन्ही बाजूने रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केलीय. युद्धाच्या पहिल्या दिवशी येथील सामन्य जनजीवन विस्कळीत झाल्याचं आणि नागरिकांनी घाबरुन शहरं सोडत असल्याचं चित्र दिसून आलं. शहरांबाहेर पडण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा, धोक्याचे सायरन, पोलिसांच्या गाड्या असं चित्र युक्रेनमधील सर्वच शहरांमध्ये दिसत होतं.

राजधानी कीवमधील मुख्य विमानतळही सरकारने रशियाने बॉम्ब हल्ले केल्याने बंद केलंय. यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडलेत. याच विद्यार्थ्यांपैकी एका मुंबईकर विद्यार्थिनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्हिडीओ कॉलवरुन संवाद साधलाय. या संवादाचा व्हिडीओ पटोले यांनी ट्विट केला असून युक्रेनमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचं यावेळी तेथे अडकलेल्या चैताली नावाच्या विद्यार्थिनीने म्हटलं आहे.

A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
A little boy leaving home cried hugging his mother after Diwali holidays are over
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या! घर सोडून जाणारा चिमुकला आईला मिठी मारून रडला, माय लेकाचा VIDEO होतोय व्हायरल
Vasai alarm ATM center, alarm ATM, Vasai,
एटीएम केंद्रातील अलार्मचा ५ तास नागरिकांना मनस्ताप
viral video girl lost balance while get in the moving train will be shocked to see what happened next
भयंकर! वेफर्स घ्यायला प्लॅटफॉर्मवर उतरली अन् तेवढ्यात ट्रेन सुरु झाली; तरुणीनं पुढे काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल

मुलांना परत आणा मोदीजी…
“युक्रेनमधील संकटात अडकलेल्या मुंबईतील चैताली नावाच्या विद्यार्थिनीशी आज मी संवाद साधला. युद्धामुळे तेथील परिस्थिती फार चिंताजनक झालीय. तेथे अडकलेले भारतीय विद्यार्थी भारत सरकारच्या मदतीची अपेक्षा करतायत. निवडणूक प्रचार थांबवून लवकरात लवकर आपल्या देशातील मुलांना मायदेशी घेऊन या मोदीजी,” अशा कॅप्शनसहीत नाना पटोलेंनी हा व्हिडीओ ट्विट केलाय.

नक्की पाहा हे फोटो >> मेट्रो स्थानकांत आश्रय, ATM समोरील रांगा, गाड्यांची गर्दी, रस्त्यावर तोफा अन्…; युक्रेन युद्धाची दाहकता दाखवणारे फोटो

सामान्य जनजीवन विस्कळीत…
नाना पटोले चैतालीशी संवाद साधताना तिला तू तिथं काय शिकते असा पहिला प्रश्न विचारला. त्यावर, “मी इथे प्राण्यांच्या डॉक्टरीचं शिक्षण घेतेय,” असं चैतालीने सांगितलं. तिथे काय परिस्थिती आहे असं नाना पटोलेंनी विचारल्यानंतर चौतालीने युद्धाच्या पहिल्या दिवशी नक्की युक्रेनमध्ये सर्वसामान्यांचं जनजीवन कसं विस्कळीत झालंय याची माहिती दिली.

नक्की वाचा >> Russia vs Ukraine War: रात्री उशीरा पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन; फोनवर म्हणाले, “रशियाचे…”

पाणी संपलं…
“सध्या पोलीस फिरतायत गाड्या घेऊन. इथले लोक सकाळी सहा-साडेसहापासून घाबरलेल्या अवस्थेत आहेत. एटीएममधले पैसे संपलेत. पाण्याच्या बाटल्या विकल्या जात आहेत. पण इथे सार्वजनिक ठिकाणी पैसे देऊन पाणी भरण्यासाठी फिल्टरही असतात. त्या फिल्टरमधील पाणीही संपलंय,” असं चैतालीने सांगितलं.

लोक वेड्यासारखं सामान खरेदी करतायत…
“सामान संपत चाललंय. इथं लोक वेड्यासारखं सामान खरेदी करतायत. अगदी लुटल्यासारखं करत आहेत. दुकानातलं जेवण, पाणी, एटीमएमधली कॅश सगळं संपत चाललंय. नोटबंदीनंतर कशा रांगा लागलेल्या एटीएमसमोर तशा रांगा लागल्यात,” असंही चैतालीने युक्रेनमधील परिस्थितीसंदर्भात बोलताना सांगितलं.

विमानतळाबाहेर सहा बॉम्ब फुटले अन्….
“बेटा मग तुला परत यायचंय का?” असा प्रश्न नाना पटोलेंनी विचारल्यानंतर चैतालीने तिकीटं बूक होती आमची २७ फेब्रुवारीची अशी माहिती दिली. “कीव या देशाची राजधानी आहे. तिथं आम्ही जाणार होतो आणि तिथून विमानाने दिल्लाला येणार होतो. पण आज सकाळी पाच वाजता त्यांनी कीवमध्येच बॉम्ब फोडायला सुरुवात केली. तिथूनच आम्हाला विमान पकडायचं होतं. आमच्या क्लासमेटने एअरपोर्टवर पाऊल ठेवलं आणि एअरपोर्टच्या परिसरात सहा बॉम्ब फुटले आणि ते सगळीकडे पळत सुटले. हे सहा बॉम्बस्फोट झाल्याने इथल्या सरकारने विमानतळच बंद केलं आहे,” अशी माहिती चैतालीने दिली. “सरकारने ट्रेन, बस, टॅक्सी बंद केल्यात. सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केल्या आहेत सरकारने,” असंही चैताली म्हणाली.

नक्की वाचा >> Ukraine War: रशियाविरोधी भूमिकेसाठी भारताचा अमेरिकेला पाठिंबा आहे का? या प्रश्नावर बायडेन म्हणाले, “आम्ही…”

भारत सरकार विशेष विमान पाठवणार
काही मदत लागली तर सांग असं नाना पटोले म्हणाल्यानंतर चैतालीने, “आमची फ्लाइट खोळंबल्याने अडचणी निर्माण झाल्यात. काही कल्पना आहे का कधीपर्यंत सुरु होईल हे,” असा प्रश्न नाना पटोलेंना विचारला. “भारत सरकार विशेष विमान पाठवत आहे,” असं नाना पटोलेंनी सांगितल्यानंतर चैतालीने, “इथे खूपच मुलं अडकून पडली आहेत,” अशी माहिती दिली.

पिंपरी-चिंचवडमधील तरुणीही अडकली…
पिंपरी-चिंचवडमधील साक्षी बोराटे ही देखील युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी एक आहे. साक्षी युक्रेनमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी गेलीय. चैतालीप्राणे साक्षीसुद्धा २७ फेब्रुवारीला भारतात परतणार होती. परंतु, ज्या कीव शहरातून तिची फ्लाईट निघणार होती तिथं सध्या परिस्थिती बिकट आहे. आजूबाजूच्या परिसरात पोलीस यंत्रणा सर्वांना घरात थांबण्यास सांगत असून आम्ही तेथील युनिव्हर्सिटीमध्ये असल्याच साक्षीने ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना सांगितले आहे. अहमदनगर आणि पुण्यातील काही विद्यार्थी एकत्र असल्याचं तिने सांगितले आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी आम्हाला सुखरूप या देशातून बाहेर काढावे अशी मागणी साक्षीने यावेळी बोलताना केलीय.