राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांना जीवे मारण्यासाठी युक्रेनने क्रेमलिनवर ड्रोन हल्ला केल्या दावा बुधवारी रशियन सरकारने केला होता. तसेच त्यांनी या हल्ल्याचा एक व्हिडीओसुद्ध जारी केला होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता रशियाने अणवस्त्रांचा उल्लेख करत युक्रेनला थेट युद्धाचा इशारा दिला आहे. रशियातील भारतीय वंशाचे खासदार अभय कुमार सिंग यांनी ‘न्यूज १८’ शी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना संपवण्यासाठी युक्रेनचा ड्रोन हल्ला, VIDEO आला समोर
काय म्हणाले अभय कुमार सिंग?
“युक्रेनने बुधवारी रात्री क्रेमलिनवर ड्रोन हल्ला केला आहे आहे. आम्ही गेल्या ४८ महिन्यांपासून युक्रेनमध्ये विशेष लष्करी मोहिम राबवतो आहे. यादरम्यान आम्ही अनेकदा युक्रेनवर हवाई हल्ले केले. मात्र, युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या घरावर आम्ही कधीही क्षेपणास्र डागली नाहीत, अशी प्रतिक्रिया अभय कुमार सिंग यांनी दिली. तसेच युक्रेनला या ड्रोन हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील”, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा – अमेरिकेमुळे रशियाने रोखली भारताच्या शस्त्रांची आयात; नेमकं काय आहे कारण?
पुढे बोलताना ते म्हणाले, “हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याबाबत राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन योग्य तो निर्णय घेतील. इथून पुढे काहीही होऊ शकतं. खरं तर हे थेट युद्ध नाही. आम्ही युक्रेनमध्ये विशेष लष्करी मोहिम राबवतो आहे. आमच्याकडे खूप अणवस्त्र देखील आहेत, याचा विचार युक्रेनने करायला हवा”
हेही वाचा – रशियाचा वॅगनार ग्रुप सुदानमध्ये काय करतोय? पुतिन आपली खासगी फौज आफ्रिकेत का घुसवत आहेत?
युक्रेनने आरोप फेटाळले
दरम्यान, रशियाने केलेले आरोप युक्रेनने फेटाळले आहेत. क्रेमलिनवरील ड्रोन हल्ल्याबाबत युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक निवेदन जारी केलं आहे. या हल्ल्याशी युक्रेनचा संबंध नसल्याचं युक्रेन सरकारने म्हटलं आहे. तसेच लवकरच युक्रेन रशियावर मोठा हल्ला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.