आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात सहा महिन्यांहून अधिक काळ एकत्रित काम केल्यानंतर एक अमेरिकन आणि दोन रशियन अंतराळवीर गुरुवारी पृथ्वीवर परतले. युक्रेनमधील राजकीय संघर्षांवरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील मतभेद अधिक ताणले गेले असताना या तीन अंतराळवीरांनी जमिनीवर पाऊल ठेवले आहे.
अमेरिकेचा स्टीव्हन स्वान्सन आणि रशियाचे अलेक्झांडर स्क्वोत्र्सोव आणि ओलेग अर्तेमयेव या तिघांनी गेल्या २६ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र सोडले. गुरुवारी सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी ते ‘सोयुज’ अवकाशयानाने ते कझाक तळावर उतरल्याचे रशियाच्या ‘रोस्कोसमॉस’ आणि अमेरिकेच्या ‘नासा’ संस्थेने मिळून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातील एका विभागात तिघांनी मिळून संशोधन केले.
युक्रेनवरील शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर दोन्ही देशांतील मतभेद कमालीचे वाढले आहेत. कझाक येथील तळावर उतरल्यानंतर मिनिटभर तिघांनी सर्वाकडे पाहून दीर्घ स्मित केले आणि हवेत हात उंचावले. अवकाश केंद्रात तिघांनी आपल्या एकूण १६९ दिवसांच्या कालावधीत विज्ञान आणि तंत्रज्ञानावर संशोधन केले. यात एका आठवडय़ात विक्रमी ८२ तासांचे संशोधन केले आहे. तिघांनी मिळून २७०० वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा       घातल्या आहेत.

Story img Loader