युक्रेन युद्धानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत. याचा फटका भारतालाही बसला आहे. आता रशियाने भारताच्या शस्त्रांची आयात रोखली आहे. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधामुळे भारताला रशियाकडून लष्करी सामानांची खरेदी करता येत नाही आहे.
मागील वर्षी भारताने रशियाकडून २०० कोटी डॉलरच्या शस्त्रांची खरेदी केली होती. पण, रशियाने १ हजार कोटी रुपयांच्या सुट्ट्या भागांची आयात अद्यापही केली नाही. त्याचबरोबर एस-४०० क्षेपणास्त्राची आयातही रशियाने केली नाही, अशी माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
भारत अमेरिकन डॉलरमध्ये पैसे देण्यास असमर्थ
भारत अनेक दशकांपासून रशियाकडून शस्त्रांची खरेदी करत आहे. रशिया भारतीय रूपयांत पैसे घेण्यास तयार नाही आहे. तर, भारत अमेरिका डॉलरमध्ये पैसे देण्यास सक्षम नाही आहे. त्यामुळे भारत आणि रशियात शस्त्रांचा व्यवहार ठप्प पडला आहे. शस्त्रांच्या खरेदीसाठी दोन्ही देश अन्य मार्गांचा अवलंब करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : कर्मचाऱ्यांवर धाकदपटशाचा आरोप, ब्रिटनच्या उपपंतप्रधानांचा राजीनामा
दरम्यान, मॉस्को दौऱ्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी या मुद्द्यावर चर्चा केली होती. तसेच, रशियाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात शस्त्रांच्या खरेदीसंदर्भात चर्चा झाली होती. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, अशीही चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली.