रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धाचा आज सातवा दिवस सुरू आहे. युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. परंतु मंगळवारी खार्कीव्ह शहरात तोफमाऱ्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यामुळे युक्रेनमधून परतण्यासाठी मदतीची याचना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपुढील संकटाची गंभीरता समोर आली आहे. अशातच एका भारतीय विद्यार्थीनीने तिथली धक्कादायक परिस्थिती एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

VIDEO: रशियन सैन्याला थांबवण्यासाठी तो टँकवर चढला, पण लष्करानं घेरलं अन्…..

उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील गरीमा मिश्रा नावाच्या एका तरुणीचा व्हिडीओ काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. युक्रेनमध्ये देशातील मुलींसोबत जे घडले ते भयावह आहे. पण त्याचवेळी पंतप्रधान मोदी निवडणुका जिंकण्यात व्यस्त होते, अशी टीका काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करताना केली आहे.

“त्यांच्यावर कोणतं संकट येणार आहे, याची त्यांना कल्पनाही नाही”, जो बायडेन यांचा रशियाला इशारा; घेतला मोठा निर्णय!

या व्हिडीओत ही तरुणी सांगते की, “आम्ही किव्हमध्ये अडकून पडलो आहोत. रशियन सैन्याने शहराला चहुबाजूंनी घेरलंय. आम्हाला इथे कोणत्याच प्रकारची मदत मिळत नाहीये. आम्हाला मदत मिळेल, अशी आशादेखील राहिलेली नाही. आम्ही भारतीय दुतावासाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. पण ते आमचा फोन उचलत नाहीये. आमचा कुणाशीच संपर्क होत नाहीये. आम्ही इथे अडकून पडलो आहोत.”

“आम्ही जिथे राहतोय तिथे काल रात्री काही लोक आले, त्यांनी गोंधळ घातला, गेट तोडला आणि आत येण्याचा प्रयत्न केला. आम्ही इथून कसंतरी ट्रेन, बस किंवा कारने बाहेर निघण्याचा विचार करत होतो. परंतू कारने बाहेर पडलेल्या भारतीय मुलांवर रशियन लष्कराने गोळीबार केला, त्यानंतर ते भारतीय विद्यार्थीनींचं अपहरण करत त्यांना घेऊन निघून गेलेत, त्यांनी त्या मुलींना कुठे नेलंय, याबद्दल काहीच माहिती मिळत नाहीये. तर, त्यांच्यासोबत असलेली मुलं कुठे गेलीत, याबद्दलही काहीच माहिती नाही,” असं या तरुणीने सांगितलं.   

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russian army kidnapped indian girl students claim girl stuck in ukraine hrc